शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवेला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:22 IST

ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे.

ठळक मुद्देकोच कारखान्याचा डीपीआर तयार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सेवा प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून, या सेवेंतर्गत मेट्रो रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर १२० किमी वेगाने धावणार आहे. प्रवाशांना इंटिग्रेटेड तिकीट आणि ट्रॅव्हल कार्डची सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी देताना रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल कार्यालयाला महामेट्रोसोबत करार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे प्रारूप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर बीजी एसी कोचची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.दर १५ मिनिटांनी प्रति तास ८० किमी वेगाने मेट्रो रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात बुधवारी झाली. त्यानंतर मेट्रो हाऊसमध्ये दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीक्षित म्हणाले, नागपुरात मेट्रो कोचचा कारखाना सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. कोच कारखान्यासाठी जमिनीची खरेदी अजूनही करण्यात आलेली नाही. त्याचा खर्चही मंजूर झालेला नाही.डिसेंबर २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होणारआतापर्यंत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. पण बुधवारी दीक्षित यांनी याचा इन्कार करीत, प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२० पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यादिशेने बांधकाम वेगाने सुरू आहे.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन