शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नागपुरातील मेट्रोला ८० च्या स्पीडला रेल्वे बोर्डाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:03 IST

मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे.

ठळक मुद्दे‘आरडीएसओ’तर्फे ऑसिलेशन चाचणी : सीताबर्डी ते खापरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. या संबंधीचे प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाने महामेट्रो नागपूरला प्रदान केले आहे. या प्रमाणपत्रामुळे आता या दोन स्टेशनदरम्यान प्रवासाचा अवधी कमी करण्याची नागपूरकरांची मागणी आता पूर्ण होणार आहे.या संबंधाने ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन’ने (आरडीएसओ) काही दिवसांपूर्वी ऑसिलेशन चाचणी घेतली होती. या चाचणी अंतर्गत ९७० प्रवाशांच्या वजनाएवढी रेतीची सुमारे चार हजार पोती मेट्रो रेल्वेत ठेवली होती. या पोत्यांचे एकत्रित वजन ६३ टन इतके होते. सीताबर्डी-खापरी मार्गिकेवर ही चाचणी घेतली होतीया परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. ‘आरडीएसओ’ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते, यातून मिळणारी माहिती संकलित करण्यात आली होती.या अंतर्गत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशीप इंडेक्स, आपातकालीन ब्रेक व्यवस्थासारख्या मानकांचीदेखील चाचणी करण्यात आली होती. या सर्व मानकांतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून विविध प्रकारच्या चाचण्या आरडीएसओतर्फे करण्यात आल्या होत्या. या नंतर याचा सविस्तर अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला होता. ज्याला रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली असून सीएमआरएसच्या चाचणीनंतर अधिकतम ८० किमी प्रति तास स्पीडने मेट्रो लवकरच धावताना बघायला मिळणार आहे.सीएमआरएस गुरुवारपासून मेट्रोच्या दौऱ्यावरवर्धा मार्गावरील(रिच१, ऑरेंज लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी नागपूरला येणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यावर ‘सीएमआरएस’ आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग आणि त्यांचे सहयोगी वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनदम्यान परीक्षण करणार आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर