शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 28, 2023 18:54 IST

यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

नागपूर : रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी व कंत्राटदार की स्टोन इन्फ्रा बिल्ड यांनी अजनी येथील इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता तब्बल दोनशेवर झाडे विनापरवानगी कापली, अशी धक्कादायक माहिती महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

हा प्रकल्प अंमलात आणताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी स्वच्छ असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, असोसिएशनने या प्रकल्पाकरिता अनेक झाडे अवैधपणे कापली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, यासंदर्भात २२ एप्रिल रोजी महानगरपालिकेला तक्रार सादर केल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने महानगरपालिकेला यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. स्वच्छ असोसिएशनच्या तक्रारीनंतर मनपाच्या उद्यान अधीक्षकांनी प्रकल्प स्थळाचे सर्वेक्षण केले असता एका भागातील ९७ तर, दुसऱ्या भागातील १०० ते १२० झाडे विनापरवानगी कापण्यात आल्याचे आढळून आले, असे मनपाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५४ एकर जमिनीवर विकासकामे केली जाणार आहेत. रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने विकासकामे करण्यासाठी कीस्टोन इन्फ्रा बिल्ड या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदाराने १२ एप्रिल २०२३ रोजी मनपाच्या वृक्ष प्राधिकरणला अर्ज सादर करून केवळ दोन झाडे कापण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे उद्यान अधीक्षकांनी त्यांना १८ एप्रिल रोजी पत्र पाठवून ७६ नवीन झाडे लावण्याचे व त्यांची सात वर्षे देखभाल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ जून रोजी वृक्ष प्राधिकरणने या निर्देशाचे पालन करण्याच्या अटीवर कीस्टोनला दोन झाडे कापण्याची परवानगी दिली होती. इतर झाडे विनापरवानगी कापण्यात आली. सध्या प्रकल्पस्थळी ३५७ झाडे शिल्लक आहेत, असेही मनपाने न्यायालयाला सांगितले.

इमामवाडा पोलिसांनी नोंदविला एफआयआरअवैधपणे झाडे तोडण्यात आल्यामुळे मनपाने इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी १० मे रोजी संबंधित आरोपींविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्यातील कलम २१ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. याशिवाय, मनपा उद्यान अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी रेल ऑथोरिटी व कीस्टोन या दोघांनाही नोटीस बजावली होती. त्यांनी नोटीसला उत्तर सादर करून आरोपांचे खंडन केले, असेही मनपाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर