शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तिकीट दलालांवर रेल्वेचा फास : एकाच दिवशी तिघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:38 IST

रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशावरून गुप्त पद्धतीने चालविण्यात आलेल्या ‘मिशन स्टॉर्म’ अंतर्गत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफ शाखेने कारवाई करून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तीन दलालांना अटक केली.

ठळक मुद्देआरपीएफचे ‘मिशन स्टॉर्म’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशावरून गुप्त पद्धतीने चालविण्यात आलेल्या ‘मिशन स्टॉर्म’ अंतर्गत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफ शाखेने कारवाई करून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तीन दलालांना अटक केली. लार्सन सुनील अल्फान्सो (२४) रा. पद्मावतीनगर, गोधनी, संजय गोपाल सिरीया (४३) मानकापूर आणि विशाल रामभाऊ चौरागडे (३९) अशी आरोपींची नावे आहेत. तिघांजवळ ६४ हजार ४३० रुपयांच्या २९ लाईव्ह तिकिटांसह कॉम्प्युटर आणि ९ लाख ५० हजार ३४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अनेक दिवसांपासून ई-तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने सापळा रचून या तिन्ही दलालांना अटक केली आहे.७.५३ लाखाची जुनी तिकिटेतिन्ही दलालांजवळ ६१८ जुनी ई-तिकिटे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत ७ लाख ५३ हजार ९१७ रुपये होती. यातील गोधनी येथील रहिवासी लार्सन याच्या जवळ सर्वाधिक ५ लाख रुपयांची ४९१ तिकिटे संगणकातून जप्त करण्यात आली आहेत. यावरुन हे तिघेही अनेक दिवसांपासून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहम्मद मुगिसुद्दीन, सतीश इंगळे, प्रकाश रायसेडाम, इशांत दीक्षित, आर. एस. बागडेरीया, सुभाष आदवारे, एस. घोष यांनी पार पाडली.झोनचा देशात दुसरा क्रमांकगुरुवारी आणि शुक्रवारी देशभरात २०५ प्रमुख शहरात एकाचवेळी हे अभियान राबविण्यात आले. अभियानात ३३८ ठिकाणी कारवाई करून ३७५ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ४२ कोटींची ई आणि सामान्य टिकीट जप्त करण्यात आली. त्यांची संख्या २२ हजार ५०० आहे. विशेष म्हणजे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनने कारवाईत दुसरा क्रमांक मिळविला. झोनमध्ये एकूण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले. १ कोटी रुपयांच्या ई-तिकिटांसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर विभागातही १३ गुन्हे दाखल करण्यात येऊन ३५ लाखाची ई-तिकीट आणि संगणक जप्त करण्यात आले. यात १४ लाख ८० हजार ८८४ रुपयांची ई-तिकिटे आणि १९ लाख ७२ हजार ७८३ रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिटArrestअटक