शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

रेल्वेची रोजगार योजना भेदभावपूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 19:08 IST

‘सेफ्टी कॅटेगरी’मध्ये मोडणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या वारसदारांना नोकरी देण्याची योजना विविध मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे असे प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचे प्राथमिक निरीक्षण : स्वत:च दाखल केली जनहित याचिका

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘सेफ्टी कॅटेगरी’मध्ये मोडणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्यांच्या वारसदारांना नोकरी देण्याची योजना विविध मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे असे प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.‘सेफ्टी कॅटेगरी’मध्ये मोडणाऱ्यां रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा व वयाची अट पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारल्यास त्या जागेवर त्यांच्या वारसदारांना नोकरी देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ मिळावा याकरिता मध्य रेल्वेचे कार्पेन्टर खलासी गोरे देशमुख व सतीश देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाला योजनेची माहिती देण्यात आली. ती योजना न्यायालयाला घटनाबाह्य वाटली. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिकेमध्ये परिवर्तित करून घेतले.२०१४ मध्ये कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला मध्य रेल्वेकडे अर्ज सादर केले होते. परंतु, कार्पेन्टर खलासी हे पद ‘सेफ्टी कॅटेगरी’मध्ये मोडत नसल्याचे कारण देऊन त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. परिणामी, त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. न्यायाधिकरणने त्यांची याचिका खारीज करून रेल्वेचा आदेश कायम ठेवला. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांतर्फे अ‍ॅड. एच. एन. पोटभरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वे