शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्या थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
5
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
6
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
8
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
9
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
10
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
11
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
12
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
13
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
14
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
15
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
16
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
17
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
18
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
19
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
20
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नागपूरच्या झिरो डिग्री बारवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:19 IST

शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : नशेत आढळले ५८ ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. राजमाने यांच्या कारवाईमुळे शहरातील बार आणि पब संचालकात खळबळ उडाली आहे.भेंडे ले-आऊट, स्वावलंबीनगर येथील रहिवासी तपन रमेशकुमार जायसवालचा एमआयडीसीत झिरो डिग्री बार आहे. हा बार नेहमीच चर्चेत राहिला आहे. एका गुन्हेगाराने येथे फायरिंग करून खळबळ उडवून दिली होती. बारमध्ये नेहमीच गुन्हेगारी आणि असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. पोलिसांच्या हाती लागलेले गुन्हेगार या बारचे नियमित ग्राहक असल्याची माहिती मिळाली होती. येथे पहाटेपर्यंत बिनधास्तपणे ग्राहकांना सेवा देण्यात येते. पोलिसांनी यापूर्वीही येथे दोनदा धाड टाकून कारवाई केली होती. त्यानंतरही बार संचालकाच्या वागणुकीत बदल झाला नाही. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांना रात्री गस्त घालताना पहाटे ४ वाजेपर्यंत बार सुरू राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित बारवर धाड टाकली. पोलिसांचे वाहन पाहून बारच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सतर्क केले. ते मागील दाराने पळत होते. हे पाहून पोलिसांनी बारला घेराव घातला. परंतु काही ग्राहक पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांना बारमध्ये ५८ ग्राहक अढळले. यात युवक-युवतींची संख्या अधिक होती. चौकशीत अनेक युवक-युवती आपली ओळख लपवीत होते. काही ग्राहक अल्पवयीन असल्याची पोलिसांना शंका आली. परंतु कागदपत्र नसल्यामुळे माहिती घेऊन त्यांना सोडण्यात आले. बारमधील बहुतांश ग्राहक नशेत तर्र झाले होते. काही युवक-युवतींनी चांगलीच नशा केली होती. बारमध्ये कॅबिन तयार करण्यात आल्या होत्या. तेथे विशेष ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. ग्राहकांनी गोंधळ घातल्यास बारमध्ये बाऊन्सरसह ७५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उशिरा बार सुरू ठेवण्याबाबत विचारणा केली असता तपन जायसवालच्या चेहºयावरील रंग उडाला. विशेष कॅबिनबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. बारमध्ये ग्राहक मादक पदार्थांचे सेवन करीत असल्याची पोलिसांना शंका आहे. बारमधील गुन्हेगारीवृत्तीच्या नियमित ग्राहकांकडून तशी माहिती मिळाली होती. धाड टाकल्यामुळे मादक पदार्थ गायब केल्याची शंका आहे. एमआयडीसी पोलिसांनी तपन जायसवालविरुद्ध मुंबई पोलीस कायदा तथा ठराविक कालावधीनंतर बार सुरू ठेवल्याबद्दल चालानची कारवाई केली आहे.कारवाईमुळे पसरली दहशतडीसीपी राजमाने यांच्या कारवाईमुळे उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाºया बारच्या संचालकात दहशत निर्माण झाली आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी बार आणि संवेदनशील स्थळांवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा जायसवालने पहाटेपर्यंत बार सुरू ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.कुणाचे आहे अभयझिरो डिग्री बारच्या संचालकाला कोणाचे अभय आहे, हा प्रश्न कारवाईनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी जायसवालविरुद्ध हप्ता वसुली आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात हे प्रकरण खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते. तपासात जायसवाल आणि तक्रारकर्ता यांच्यात क्रिकेट सट्टा वसुलीमुळे वाद झाल्याचे समजले होते. त्यानंतरही पोलिसांनी जायसवालच्या हालचालींवर लक्ष ठेवले नाही.कठोर कारवाई करणारयाबाबत डीसीपी राजमाने यांनी बारमधील ग्राहकांची माहिती गोळा करीत असल्याचे सांगितले. काही ग्राहक गुन्हेगारीवृत्तीचे आणि अल्पवयीन असल्याची शंका आहे. त्यांची माहिती घेण्यात येत असून, जायसवालने तीनदा बार लायसन्सच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा विचार करण्यात येत आहे.

टॅग्स :raidधाडhotelहॉटेल