शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नागपुरातील  मटका किंग तुलसी मसरामच्या अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:58 IST

मानकापुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून १३ सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली.

ठळक मुद्दे१३ सट्टेबाज जेरबंद : सव्वादोन लाखांची रोकड जप्त : परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापुरातील मटका किंग तुलसी मसरामच्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून १३ सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त करण्यात आली.मानकापूरच्या सादिकाबाद कॉलनीत मसरामचा मटक्याचा अड्डा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, तुलसी मसराम मानकापूर पोलिसांसोबतच कोराडी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील तसेच गुन्हेशाखेतील काही विशिष्ट पोलिसांना महिन्याला हजारो रुपयांची देण देतो. त्यामुळे तुलसीच्या अड्ड्यावरचा मटका फोडण्याची पोलीस तसदी घेत नाहीत. त्यामुळे त्याच्या मटका अड्ड्यावर दारूच्या दुकानासारखी गर्दी असते. परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना ही माहिती कळताच त्यांनी सीताबर्डी पोलिसांना छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने तुलसीच्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी तेथे रजत रामाजी मोहोड, शेख शहबाज शेख हारून, अंकुश कुशील वासनिक, बंटी भाऊराव उईके , सुधाकर चिंधूजी नान्हे , दिलीप नत्थूजी सोनटक्के , विलास आत्माराम बडपात्रे, एहतेशाम गुलशन खान, हमीद यूसुफ खान, अनिल श्यामसिंह बघेल, इमरान खान वसीम खान, विकास वसंतलाल खाडोळे आणि मनोज वसंतराव मसराम हे सट्टेबाज आकड्याचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेथून रोख २२२७३५ रुपये, मोबाईल तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. या दुचाकीत पोलिसांना महेंद्र मुरलीधर भगतच्या नावे पाच आणि तुलसी मसरामच्या नावे एक समन्स सापडला. आकड्याची खायवाडी करणारा आरोपी रजत मोहोड याने हा मटका अड्डा तुलसी मसरामचा असल्याचे पोलिसांना सांगितले. सादिकाबाद कॉलनीतील पासपोर्ट आॅफिसजवळ बाल्या चौधरीच्या कॉम्प्लेक्समध्ये गाळा घेऊन तुलसी तेथून मटका अड्डा चालवित होता.पोलिसांची पोलखोलपोलीस उपायुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे मानकापूर पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. एवढा मोठा मटका अड्डा सुरू असताना पोलिसांनी डोळे बंद का करून घेतले होते, या प्रश्नाचे उत्तर आता मानकापूर पोलिसांना द्यावे लागणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीस