शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

नागपुरात क्राईम ईन्वेस्टीगेशन एजंसीच्या कार्यालयावर छापा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:03 IST

क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेने उपराजधानीत कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. या संस्थेच्या कथित प्रमुखाने त्याच्या कारवर मोठ्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियल लावले आहे. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजंसी’ असे लिहिलेली प्लेट कम फलकही लावला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघड झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देतामझाम पाहून पोलीसही चक्रावले : यवतमाळच्या तरुणाची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेने उपराजधानीत कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. या संस्थेच्या कथित प्रमुखाने त्याच्या कारवर मोठ्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियल लावले आहे. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजंसी’ असे लिहिलेली प्लेट कम फलकही लावला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघड झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.अजनी (चुना भट्टी) जवळच्या पूर्व समर्थनगरात एफसीआय गोदाम असून, या गोदामाजवळच्या एका इमारतीत १४ फेब्रुवारीला यवतमाळ येथील नरेश पालारपवार नामक व्यक्तीने सीआयएचे कार्यालय थाटले. १६ फेब्रुवारीपासून तेथे विविध प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारी घेतल्या जात असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळाले. त्यावरून गुन्हे शाखा आणि धंतोली पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी या कार्यालयात धडकले. कार्यालयाच्या आतमधील साजसज्जा गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयासारखी असल्याचे आणि बाह्यदर्शनी भागात एक वायरलेस सेट (बंद पडलेला) ठेवून असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. कार्यालयातील एक युवती कागदपत्रे हाताळत होती तर, बाहेर पालारपवार याची एमएच २९ / एडी ४६९६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी होती. कारवर लाल-निळ्या रंगाचा सीआयएचा झेंडा तसेच इंग्रजीत लिहिलेली ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ भली मोठी नेमप्लेटही लावून होती. पोलिसांनी कार्यालय प्रमुख नरेश पालारपवारला विचारणा केली असता त्याने आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेने विविध प्रकरणाची चौकशी करणार होतो, असे सांगितले. पोलिसांनी तेथील कागदपत्रे जप्त करून पालारपवारला धंतोली ठाण्यात नेले. तेथे त्याची उशिरा रात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली.उत्तर प्रदेश कनेक्शन !सीआयएचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील गौंडा जिल्ह्यात असून तेथील प्रमुखाकडूनच आपण नागपुरात कार्यालय सुरू करण्याची परवानगी घेतल्याचे पालारपवारने पोलिसांना सांगितले. त्याचा संपर्क क्रमांकही दिला. त्यावरून पोलिसांनी प्रताप सिंग नामक व्यक्तीशी संपर्क करून त्याला मूळ कागदपत्रांसह नागपुरात येण्यास सांगितले. सिंग मंगळवारी नागपुरात येणार असून, पालारपवारला शनिवारी दुपारी ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात मंगळवारी कारवाईची भूमिका ठरवू असे धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी