शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एमआयडीसीतील मटका अड्ड्यावर छापा : २२ जुगारी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:24 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी एमआयडीसीतील एका मटका अड्ड्यावर छापा घालून मटका चालविणारा आणि खेळणाऱ्या एकूण २२ जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि मटकापट्टी जप्त करण्यात आली. एमआयडीसीतील झोन चौकात गेल्या अनेक वर्षांपासून अफसर खान नामक गुन्हेगार मटक्याचा अड्डा चालवतो. त्याच्या अड्ड्यावर दिवसभर मटका लावणारांची वर्दळ असते. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी कल्याण मटका खेळणाऱ्या २२ जणांना पकडण्यात आले.

ठळक मुद्देरोख आणि मटकापट्टी जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी एमआयडीसीतील एका मटका अड्ड्यावर छापा घालून मटका चालविणारा आणि खेळणाऱ्या एकूण २२ जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि मटकापट्टी जप्त करण्यात आली.एमआयडीसीतील झोन चौकात गेल्या अनेक वर्षांपासून अफसर खान नामक गुन्हेगार मटक्याचा अड्डा चालवतो. त्याच्या अड्ड्यावर दिवसभर मटका लावणारांची वर्दळ असते. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी कल्याण मटका खेळणाऱ्या २२ जणांना पकडण्यात आले. 

रमेश लक्ष्मणराव काळबांडे, मनोहर प्रभाकर खंडारे, मनोज जानराव कुंभारे, शैलेश बाबुराव मेश्राम, हरीदास आत्माराम मेश्राम, अनिल विष्णुदास यादव, रामआशिष बैजनाथ पासवान, कैलास मनोहर ठाकरे, राहुल मुलचंद काठार, सतीश राजेश सिंग, प्रकाश गजानन मस्के, विनोद रामकुमार पंडित, प्रभाकर सीताराम बेलेकर, किशोर शामराव शेंडे, अमृत अंबादास कुमरे, बब्बू जनिरामराव चौरागडे, सुभाष बबन सोनकुसरे, सुरेश मनोहर पानुरकर, स्वप्निल वामन परबत, मनोहर मोतीरामजी पांडे, वासुदेव श्रीपाद हिवाळे आणि ज्ञानेश्वर सोमाजी ठाकरे अशी मटका खेळताना पकडल्या गेलेल्यांची नावे आहेत. या २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख आणि मटक्याच्या साहित्यासह ६२,३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त आरोपींविरुद्ध एमआयडीसी ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट एकचे पथक प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडSatta Bazarसट्टा बाजार