शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरच्या महेंद्रनगरातील कोंडवाड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:43 IST

पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरूच होती.

ठळक मुद्देकत्तलीसाठी नेणार होते तस्कर : निर्दयपणे डांबलेल्या जनावरांची सुटका : पाचपावली पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरूच होती.गो-वंश तस्करी करणारे आरोपी मोठ्या संख्येत महेंद्रनगरात जनावरांना डांबून ठेवत असून, त्या मुक्या जीवांना कत्तलखान्यात पाठवले जाणार असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस उपयुक्त राहुल माकणीकर आणि ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी कारवाईची तयारी केली. मोठ्या संख्येत पोलीस बळ मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास महेंद्रनगरातील पाण्याच्या टाकीजवळ पाठविण्यात आले. पोलिसांचा छापा पडताच गो-वंश तस्करी करणारांनी पोलिस कारवाईचा जोरदार विरोध केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बळाचा वापर करताच तस्करी करणारांनी तेथून पळ काढला. त्यांच्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी सुमारे २५० जनावरांना अत्यंत निर्दयपणे कोंडवाड्यात कोंडून ठेवले होते. त्यांचे करकचून हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. हे सर्व जनावर कत्तलखान्यात पाठविण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारल्याने या मुक्या जनावरांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, अशा प्रकारे पोलिसांनी येथे यापूर्वीदेखिल कारवाई केली आहे. मात्र, आजची कारवाई यापूर्वीच्या कारवाईत सर्वात मोठी आहे.चारापाण्याची सोय अन् धावाधावदुपारी मुक्या जनावरांची मुक्तता करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ही जनावरे गोरक्षणमध्ये पाठविण्याची धावपळ सुरू झाली. जास्त संख्येत जनावरे असल्याने गोरक्षणमधील जागा अपूरी पडली. त्यामुळे स्थानिक गोरक्षण, खापरी आणि बेल्यातही पोलीसांनी विचारणा केली. मात्र, पोलिसांना अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही, या मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत धावपळ सुरू होती. परिणामी मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहका-यांसह मध्यरात्रीपर्यंत कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया राबवत होते.

टॅग्स :cow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारnagpurनागपूर