शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सिलिंडर रिफिलिंगच्या अवैध कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:50 IST

विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला.

ठळक मुद्देधोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग २९५ सिलिंडर जप्त, आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला. येथून छोटी-मोठी २९५ सिलिंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून एका आरोपीला अटक केली. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे हिंगणा- एमआयडीसीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.क्रिष्णकांत वशिष्ठ कुंवर (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील काळमेघनगरात राहतो. त्याचे भारत ट्रेडिंग कंपनी नावाने दुकान आहे. तो स्वत:ला गो-गॅस कंपनी हिंगणा विभागाचा वितरक असल्याचे सांगतो. बाजूलाच त्याचे गोदाम आहे. या गोदामात तो विविध कंपन्यांच्या सिलिंडरमध्ये गॅस पाईप आणि अ‍ॅडॉप्टरच्या माध्यमातून छोट्या (दिल्ली मेड) सिलिंडरमध्ये गॅस भरतो आणि त्याची अवैध विक्री करतो, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.त्यावरून ठाणेदार सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पी. सयाम, गिरीधर ठवरे, हवलदार विजय नेमाडे, श्यामनारायण ठाकूर, नायक मंगेश गवई अणि अभिजित यांनी शनिवारी रात्री ७ च्या सुमारास कुंवरच्या गोदाम कम कारखान्यावर छापा घातला. त्यावेळी आरोपी मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर याच्याकडून गो गॅसचे ७१, भारत गॅसचे २४ आणि दिल्लीमेड (छोटे) २०० असे एकूण २९५सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.

मोठे रॅकेट कार्यरत ?जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख, ५२ हजार, ३५० रुपये आहे. पोलिसांनी स्फोटक पदार्थ कायदा आणि अन्य कलमासह गुन्हा दाखल करून आरोपी कुंवर याला अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. आरोपी या धोकादायक धंद्यात एकटा नसावा, त्याचे अन्य साथीदारही यात सहभागी असावे, असा संशय आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यास मोठे रॅकेट हाती लागू शकते.

आयुक्तांकडे माहितीरात्री ७ वाजतापासून सुरू झालेली कारवाई मध्यरात्री आटोपून पोलीस रिकाम्या हाताने परत जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून एका सतर्क नागरिकाने थेट पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना त्याची माहिती दिली. कारवाईत गोलमाल होण्याची शक्यताही व्यक्त केली. त्याची दखल घेत आयुक्तांनी एमआयडीसीचे ठाणेदार महाडिक यांना विचारणा केली. त्यांना कडक कारवाई करण्याचेही निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी २९५ सिलिंडर जप्त करून ते ठाण्यात आणले. जप्त केलेले हे सिलिंडर ठाण्यात ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे पोलिसांनी पुरवठा विभागाला कारवाईची माहिती देऊन हे सिलिंडर ताब्यात घेण्याची सूचना केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याने त्याला नकार दिला. त्यामुळे हे सिलिंडर आता कुठे ठेवावे, असा प्रश्न एमआयडीसी पोलिसांना पडला आहे.

स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर मोहल्लाज्या भागात आपण राहतो, तेथे असा भयावह प्रकार सुरू होता, हे लक्षात आल्याने हिंगणा, एमआयडीसी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गॅस सिलिंडर ठेवून त्यातील गॅस काढून दुसऱ्यात भरत होता. यादरम्यान कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती होती. तसे झाले असते तर हा भाग बेचिराख होऊन मोठ्या प्रमाणावर जानमालाची हानी झाली असती. आरोपी कुंवरने केवळ त्याचे घरच नव्हे तर संपूर्ण मोहल्लाच स्फोटकाच्या ढिगाऱ्यावर ठेवल्यासारखा प्रकार केला होता.

टॅग्स :crimeगुन्हे