शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 नागपूरच्या  यशोधरानगरातील हुक्का पार्लरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:28 IST

यशोधरानगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये छापा घालून पोलिसांनी तेथून ३८ जणांना अटक केली.

ठळक मुद्देतिसऱ्या माळ्यावर धडकले पोलीस : ३८ हुक्का शौकिन ताब्यात : २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये छापा घालून पोलिसांनी तेथून ३८ जणांना अटक केली. रविवारी पहाटेला डीसीपी सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.मोहित गुप्ता नामक व्यक्तीच्या इमारतीत रॉनी मायकेल नामक आरोपी हुक्का पार्लर चालवीत असल्याची माहिती पोलिसांना रविवारी पहाटे मिळाली. तेथे मोठ्या संख्येत हुक्का शौकिन बसून धूर उडवत असल्याचेही पोलिसांना समजले. त्यावरून डीसीपी बावचे यांनी यशोधरानगर पोलिसांना सोबत घेऊन पार्लरवर छापा घातला. तेथे सुमारे ३८ जण हुक्क्याचा धूर उडवताना आढळले. पोलिसांनी त्यांना तसेच हुक्का पार्लरच्या खाली असलेल्या तीन कार, दोन डझनपेक्षा जास्त दुचाकी आणि हुक्क्यासह सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.येथून पोलिसांनी हुक्का पार्लरचा संचालक रॉनी रेमंड मायकल, पील दानेश खुशलानी, आशिष बालानी, इमरान शेख, रोहित शुकरानी, विक्रम तलरेजा, जफर कलीम, सुफीयान अनम, दीपेश कटारिया, मनीष तेजवानी, आकाश उत्तमचंदानी, जलत ग्यानचंदानी, हितेश जेठानी, वारिस अख्तर, जय वासवानी, प्रणय रंगारी, साहिल तांबे, नेल्सन सयाम, धीरज हरचंदानी, मनीष वासवानी, दिलीप कुकरेजा, मोहम्मद जुबेर, शेख गुलाम, गुफरान मोहम्मद, अरबाज अहमद, मोहम्मद सोहेल, मोहम्मद फहीम, कुमार रूपवानी, कमल लालवानी, अनस शफी, मोहम्मद शाकीब, फहीमुद्दीन सय्यद, हसनकाजी फजलू, किशोर बनवानी, पंकज पंजवानी आणि हितेश देवानी यांना ताब्यात घेतले.बाहेर कुलूप आतमध्ये गोंधळविशेष म्हणजे, हुक्का पार्लरच्या संचालकाने या इमारतीत प्रवेश करणाऱ्या दारावर बाहेरून कुलूप लावले होते. जेथे हुक्का पार्लरचा धूर उडवला जात होता त्या हॉलच्या सर्व दारांना बाहेरून कुलूप होते. त्यामुळे पोलीस चक्रावले. मात्र, माहिती पक्की असल्याने बाजूच्या इमारतीवरून पोलीस या इमारतीच्या टेरेसवर चढले. तेथून तिसऱ्या माळ्यावर उतरले आणि बंद दाराच्या खोलीच्या खिडकीला कूलर लावून होता. तो सुरू असल्याचे पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे ते दार उघडताच आतमध्ये हुक्का पार्लर अन् तेथे गोंधळ सुरू असल्याचे पोलिसांना दिसले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCrimeगुन्हा