शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पाचपावलीतील जुगार अड्ड्यावर छापा : १७ जुगारी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:56 IST

पाचपावली पोलिसांनी नंदगिरी मार्गावरील पांडुरंग शिंदेकरच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला.

ठळक मुद्देरोख आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलिसांनी नंदगिरी मार्गावरील पांडुरंग शिंदेकरच्या घरी चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईलसह सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला.विनोद पांडुरंग शिंदेकर (वय ४१, रा. नंदगिरी रोड, पाचपावली), नरेंद्र पांडुरंग शिंदेकर (वय ५०), पांडुरंग विठ्ठल शिंदेकर (वय ७५), दिनेश बालाजी राऊत (वय ५०, रा. शेषनगर, खरबी), फारूख इब्राहिम खत्री (वय ५६, रा. बंगाली पंजा), संतोष बंसीलाल निबरे (वय ५६, रा. लालगंज), विनोद मारूती चव्हाण (वय २८, रा. पाचपावली), पंकज रमेश कोचे (वय ४१, रा.भानखेडा), विनोद तुलसीराम गुप्ता (वय ३८, रा.कांजी हाऊस चौक), करण प्रकाश ठाकूर (वय ३३, रा. पंजाबी लाईन), अब्दुल कवी मोहम्मद बशिर (वय ३२, रा.भानखेडा), संजय नेणूमल साधवानी (वय ४०, रा. हत्ती बिल्डींग चौक), सतीश गजानन पौनीकर (वय ३५, रा. कळमना), संजय यादवराव माताघरे (वय ५५, रा. गोळीबार चौक), कादर खान छोटे साहेब खान (वय २९, रा. मारवाडी चौक), सागर रामदास गुलवानी (वय ३८, रा. दयानंद पार्कजवळ) आणि कमलेश मधुकर सोनकुसरे (वय ४०, रा. गुलशननगर) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडून १९ हजार, एक टीव्ही, ८ मोबाईल, ६ दुचाकी आणि अन्य साहित्यासह ३ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे, पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जाधव, उपनिरीक्ष्रक पी. एन. खंडार, हवलदार रामेश्वर कोहळे, नायक राज चौधरी, अभय साखरे, शैलेश चौधरी, गजानन निशितकर आणि सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.पोलिसांची आहे साथअटक केलेल्यांमध्ये विनोद, नरेंद्र हे दोन सख्खे भाऊ आणि त्यांचे वडील पांडुरंग शिंदेकर अशा बापलेकांचा समावेश आहे. अनेक दिवसांपासून शिंदेकरकडे हा जुगार अड्डा सुरू होता. पाचपावलीत कार्यरत काही पोलिसांना या अड्ड्याची माहिती आणि साथ होती. मोठा हप्ता मिळत असल्यामुळे ते तेथे कारवाई करीत नव्हते. उलट कुणी कारवाई करणार असेल तर हे भ्रष्ट पोलीस शिंदेकरला सतर्क करीत होते. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे २.५५ वाजता तेथे छापा मारून जुगाºयांना रंगेहात पकडण्यात यश मिळवले.

 

 

टॅग्स :raidधाडArrestअटक