शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कळमन्यातील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:45 IST

कळमन्यातील पारडी भागात चालणाऱ्या एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून कळमना पोलिसांनी तीन बुकी पकडले. संतोष गोनुराम मलघाटी (वय२८), मंगेश गणपत निंबुळकर (वय ३४, रा. कडबी चौक) आणि सुनील मुन्नीलाल कछवारे (वय २८, रा. समतानगर), अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि १० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्दे१० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल जप्त : तीन बुकी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील पारडी भागात चालणाऱ्या एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून कळमना पोलिसांनी तीन बुकी पकडले. संतोष गोनुराम मलघाटी (वय२८), मंगेश गणपत निंबुळकर (वय ३४, रा. कडबी चौक) आणि सुनील मुन्नीलाल कछवारे (वय २८, रा. समतानगर), अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि १० मोबाईलसह पाऊण लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पुनापूर रोड, श्यामनगरमध्ये क्रिकेट सट्टा अड्डा सुरू आहे, अशी माहिती कळमना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी रविवारी रात्री तेथे छापा घातला. यावेळी तेथे संतोष मलघाटी, मंगेश गणपत निंबुळकर आणि सुनील कछवारे हे तीन बुकी क्रिकेट सामन्यावर खायवाडी-लगवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १० मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि रोख ३,२५० रुपयांसह ७६,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा क्रिकेटचा अड्डा सुरू होता. शहरातील एक बडा बुकी या तिघांना संचलित करीत होता. तो बुकी हवालात गुंतला असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.परिमंडळ ५ चे प्रभारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कळमन्याचे ठाणेदार खुशाल तिजारे, पीएसआय नीलेश गोसावी, नायक जयंता शंभरकर, पंकज लांडे, दिनेश लांजेवार, प्रफुल्ल ढवळे, पवन पिट्टलवार आणि महिला पोलीस शिपाई भावना यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Cricketक्रिकेटCrimeगुन्हा