शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोलमाफियांच्या अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:32 IST

विविध कोळसा खदानीतून ठिकठिकाणी पाठविण्यात येणारे कोळशाचे ट्रक मध्येच थांबवून त्यातून कोळशाची चोरी तसेच तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील सहा आरोपींना भंडारा रोडवरील कापसी येथे सोमवारी सकाळी रंगेहात पकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कोळसा तसेच चार ट्रक असा एकूण ६२ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक आरोपी मात्र फरार झाला आहे. पहिल्यांदाच झालेल्या या धाडसी कारवाईमुळे कोलमाफियांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देचार ट्रकसह ६२ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्तसहा तस्करांना अटक : गुन्हे शाखेची धाडसी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कोळसा खदानीतून ठिकठिकाणी पाठविण्यात येणारे कोळशाचे ट्रक मध्येच थांबवून त्यातून कोळशाची चोरी तसेच तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील सहा आरोपींना भंडारा रोडवरील कापसी येथे सोमवारी सकाळी रंगेहात पकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कोळसा तसेच चार ट्रक असा एकूण ६२ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक आरोपी मात्र फरार झाला आहे. पहिल्यांदाच झालेल्या या धाडसी कारवाईमुळे कोलमाफियांचे धाबे दणाणले आहे.अजहर शेख इनायत शेख (रा. टेकाडी इंदर कॉलनी, खदान कन्हान), नसीम शेख रहातुल्ला शेख (वय ३९, रा. दहेगाव. खापरखेडा), मंगेश धरमराज ठवरे (वय ३०, रा. हनुमान टेकडी, कन्हान), रामबहोर द्वारकाप्रसाद चौधरी (वय ३०, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश), रामचंद्र अंकुश मानकर (वय ४१, रा. सरस्वतीनगर दिघोरी) आणि उदय शंकर सिंग (वय ४८, रा. निवृत्तीनगर, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहत, तर फरार तस्कराचे नाव रामनारायण ठाकूर असून तो काटोल मार्गावर राहतो.गेल्या अनेक वर्षांपासून कोलमाफियांकडून कोळसा चोरी आणि विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. अनेकांना मोठा हप्ता मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. भंडारा मार्गावरील कापसीच्या पाल पेटोल पंपामागील जय भोले धर्मकाट्याजवळ कोलमाफियांचा अड्डा होता. त्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी छापा घातला. यावेळी तेथे उपरोक्त आरोपी चोरीच्या कोळशाची विल्हेवाट लावताना दिसले. बाजूलाच साठा करून ठेवलेला कोळसा चार ट्रकमधून काळाबाजारात विक्रीकजरता जाणार होता. पोलिसांनी साठवून ठेवलेला कोळसा तसेच कोळशाने भरलेले ट्रक जप्त केले. अनवर साहेब खान (रा. आंबेडकरनगर) यांच्या मालकीचा एक ट्रक तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे दिसून आल्यामुळे खान यांची तक्रार घेऊन कळमना ठाण्यात उपरोक्त तस्करांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस