शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्सवर छापा : २२५ पोती सडकी सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:30 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धमाननगरातील भगवान ट्रेडर्स नामक व्यापारी प्रतिष्ठानावर छापा मारून सडक्या सुपारीची २२५ पोती (कट्टे) जप्त केली. आरोग्यास घातक अपायकारक असलेली ही सुपारी रासायनिक प्रक्रिया करून पांढरी करण्याची तयारी करण्यात आली होती.भांडेवाडीतील अंतुजीनगरात (रेल्वे स्थानकाजवळ) रवी अशोक निंदेकर राहतो. त्याचे स्मॉल फॅक्टरी एरिया, वर्धमाननगरात भगवान ट्रेडर्स आहे. तेथे लाखोंची सडकी सुपारी ठेवली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांना गुरुवारी मिळाली. त्यांनी लगेच गुन्हे शाखेचे पथक तेथे पाठविले. या पथकाने भगवान ट्रेडर्सवर छापा घालून तेथे ठेवलेली २२५ पोती सडकी सुपारी ताब्यात घेतली. आरोग्याला घातक असलेली ही सुपारी गंधक आणि रासायनिक पदार्थांमध्ये मिक्स करून ती भट्टीत ठेवली जाते. त्यानंतर ही सुपारी फुगून टणक आणि पांढरी बनते. तीच सुपारी बाजारात विकून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. नागपुरात गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असून, अन्न व औषध प्रशासनातील काही भ्रष्ट मंडळींचा या गोरखधंद्याला आश्रय आहे. त्यामुळे समाजकंटक रोज हजारो पोती सडकी सुपारी पांढरी करून मध्य भारतात विकतात. गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र तेथे छापा घालून अन्न सुरक्षा अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही तेथे बोलवून घेतले. त्यांना पुढची कारवाई सोपविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. डोर्लीकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिर्के, हवालदार धर्मेंद्र सरोदे आणि विजय साळवे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस