शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भेसळ करणाऱ्या १८ दुकानांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:27 IST

इतवारी, मस्कासाथ या व्यावसायिक भागातील १८ दुकानांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाडी टाकून करून ३३ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला.

ठळक मुद्देएफडीएची इतवारीत कारवाई : तीन दुकानात जप्ती, मुदत संपलेल्या खाद्यतेलाची विक्री

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इतवारी, मस्कासाथ या व्यावसायिक भागातील १८ दुकानांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाडी टाकून करून ३३ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला.कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी १७ नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले. मस्कासाथ रेशीमओळ येथील मधुसूुदन ट्रेडर्स या दुकानात जून २०१९ ला मुदत संपलेल्या रिफाईन सूर्यफूल खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे आढळून आले. हे तेल हानीकारक असून आणि शरीरासाठी अपायकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाची वाढती मागणी पाहता या दुकानदाराने गोदामातील माल विक्रीस बाहेर काढला होता. या दुकानातून २८ हजार रुपये किमतीचे २५८ किलो खाद्यतेल जप्त केले. तर मस्कासाथ, इतवारी येथील राम ट्रेडर्समधून निकृृष्ट दर्जाचे मिरची आणि हळदी पावडर ताब्यात घेतले. या दुकानातून अधिकाऱ्यांनी दोन नमुने घेतले आणि अंदाजे ५ हजार रुपये किमतीचे २८ किलो मिरची व हळद पावडर जप्त केले. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वात आणि अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली. देशपांडे म्हणाले, व्यापारी अन्नपदार्थांमध्ये भेसळ आणि जास्त भावात विकत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत. त्या आधारे विभागाने मंगळवारी कारवाई केली. विभागाची निरंतर तपासणी सुरूच आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न विभागातील अधिकारी औषधी प्रशासन विभागाला मास्क आणि सॅनिटायझरच्या तपासणीसाठी मदत करीत आहेत.एनजीओला विभागाचे आवाहनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था गरीब आणि गरजूंना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. ही चांगली बाब आहे. पण वस्तूंचे पॅकिंग करताना जागा स्वच्छ आणि हायजेनिक आहे किंवा नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. कुणाला विषबाधा होऊ नये, हा त्यामागील उद्देश आहे. पॅकिंग करणाऱ्या जागांची माहिती द्यावी, जेणेकरून विभागाचे अधिकारी पाहणी करतील, असे देशपांडे म्हणाले.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग