शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पवारच अध्यक्ष असावे, अशी राहुल गांधींचीही इच्छा; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

By कमलेश वानखेडे | Updated: May 4, 2023 17:07 IST

पटोले गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीने पक्षांतर्गत निर्णय घेतला.

नागपूर :राष्ट्रवादीमध्ये जे काही चालले आहे त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खा. सुप्रिया सुळे यांना फोन केला. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असल्यामुळे विचारपूस करणे स्वाभाविक आहे. पवार हे अनुभवी राजकारणी आहेत. ते अजूनही पदावर राहिले पाहिजे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीने पक्षांतर्गत निर्णय घेतला. त्यांच्या पक्षातील निर्णयासाठी त्यांनी आमच्यासोबत बोलण्याची गरज नाही. कुणाला अध्यक्ष बनवावे हा त्यांचा निर्णय आहे. काहिही झाले तकरी आमची वज्रमुठ सैल होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष आहे, त्यामुळे ते भाजप सोबत जाणार नाही, असा दावाही पटोले यांनी केला.

अदानींबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट- अदानींबाबत काँग्रेस ची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी चे अदानी सोबत काय संबंध आहे, याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही. अदानी ने जो घोळ केला हे सर्वांना माहीत आहे, अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध काय, एवढेच राहुल गांधी यांनी विचारले तर त्यांची खासदारकी काढून टाकली, असा आरोप पटोले यांनी केला.

केंद्राकडून महाराष्ट्राचे लचके तोडले जात आहे- शरद पवार यांनी काय लिहावे व काय बोलावे हा त्यांच्या प्रश्न आहे. त्यांच्यावर काही बोलायचे नाही, हे आमचे ठरले आहे. पण महाराष्ट्राचे लचके केंद्राकडून तोडले जात आहेत. मुंबईचा व्यापार सूरतला नेण्याचा डाव सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे सुरू आहे. महाराष्ट्र बर्बाद करण्याची योजना आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले