शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; भंगार वेचणाऱ्यांनी धरली भिकेची झोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:57 IST

भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्दे कोरोनाची व पोलीस कारवाईच्या भीतीने काम बंदअन्नधान्यासाठी दारोदार भटकंती

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगावर मळकट कपडे आणि पाठीवर रस्त्यावर पडलेले साहित्य गोळा करण्यासाठी झोळी, असा भंगार वेचणाऱ्यांचा पेहराव. शहरात गल्लोगल्लीत, कचराकाडीत फिरून प्लास्टिक, काचेच्या बॉटल्स, पेपर व लोखंड साहित्याचे तुकडे गोळा करणे, हे त्यांचे नित्यकर्म. मात्र कोरोनाच्या धास्तीने त्यांच्या कामावर गदा आणली आहे. भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे. दिघोरी उड्डाणपुलाकडून मानेवाडा रिंग रोडकडे जाताना मोठ्या प्रमाणात असलेल्या भंगार खरेदीदारांकडे सध्या शुकशुकाट पसरला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसायही ठप्प पडला आहे. पण या परिस्थितीचा परिणाम गल्लोगल्ली भंगार वेचणाऱ्या गरीब लोकांवर पडला आहे. रिंग रोडच्या झोपडपट्ट्यांसह शताब्दी चौकासमोरच्या रहाटेनगर टोली वस्तीत या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. सकाळी उठताच खांद्यावर मोठी झोळी टांगून यांची शहरात भटकंती सुरू होते. प्लास्टिक पन्नी, बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करतात. भंगार हेच त्यांच्या उदरनिवार्हाचे साधन. असे जगताना कुणासमोर हात पसरायचे नाही, हा त्यांचा स्वाभिमान. मात्र कोरोना प्रकोपामुळे त्यांच्यावर आज हात पसरण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे भंगार खरेदीची दुकाने बंद झाली आहेत. शिवाय कचºयातून कोरोना आजार पसरतो, ही धास्ती आणि पोलीस कारवाईची भीती यामुळे त्यांनी भंगार वेचण्याचे काम बंद केले. १९ मार्चपासूनच त्यांचे हे काम बंद झाल्याचे माया नामक महिलेने सांगितले. बहुतेक पुरुष आणि स्त्रियांनाही कुठले ना कुठले व्यसन. घरी साठविलेला पैसा अडका किंवा धान्य असे काहीच नाही. त्यामुळे चक्क उपासमारीची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे या महिला आता शहरातील विविध वस्त्यांमध्ये फिरून तांदूळ आणि गहू मागण्यासाठी फिरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे या महिलांना बहुतांश लोक दारात उभेही करीत नाहीत. काही स्वयंसेवी संस्थांद्वारे अन्नदान केले जाते आणि हेच त्यांच्यासाठी आधार होत असल्याचे मायाने सांगितले. मात्र अनेकांकडून त्यांची हेटाळणी मिळत असल्याचे तिने सांगितले. मात्र, पोट भरण्यासाठी त्या प्रत्येक दारावर जाऊन आवाज देतात. त्यांचे दारोदार फिरणेही धोक्याचे आहे. त्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही अडवले नाही, असे त्यांच्यापैकी एका महिलेने सांगितले. भंगारातून मिळणारे रोख पैसे दैनंदिन व्यवहारासाठी उपयोगी पडायचे. ते मिळणे आता बंद झाले आहे. यामुळे भंगार गोळा करण्याऐवजी आता भिकेची झोळी घेऊन कोरोनाने आलेल्या परिस्थितीशी झगडत आहेत.

 अनेक कुटुंबांचे हालमायाला दोन मुले आहेत. तिच्यासोबतची मंदा तीन मुलींची आई आहे. आलेल्या परिस्थितीमुळे अनेकदा उपाशी राहण्याची पाळी येते. मुलांचेही हालहाल होत आहेत. त्यामुळे भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी रस्त्यावर उभे असताना कुणाकडून तरी तांदूळ व इतर धान्य मिळाले. परंतु तेल, मिठासाठी पैसे हवेत. मुलाबाळांना लागणाऱ्या वस्तूंसाठी पैसे हवे म्हणून भीक मागण्याचा पर्याय निवडल्याचे त्या म्हणाल्या.

- लोक दारापुढे येऊ देत नाहीत. पूर्वी गल्ल्यात फिरताना कुणीही रोखत नव्हते. आता मात्र फिरताना दिसले की जोरात ओरडतात. कोणत्या तरी आजाराच्या (कोरोना) भीतीने लोक त्यांच्या दारापुढे गेलो की खेकसतात, पळवून लावतात; मात्र काही लोक दया करून काही खायला देतात किंवा धान्यही देतात. इतक्या वर्षात कधी अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे या महिलांनी आवर्जून सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस