शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:32 IST

अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या ट्रॅक मेन्टेनरने आत्महत्या केल्याची घटना घडली. ५ मार्चला आत्महत्या केल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवलेला मृतदेह घेऊन संतप्त रेल्वे कर्मचारी ‘डीआरएम’ कार्यालयात पोहोचले. त्यांनी जोरदार नारेबाजी करीत दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.

ठळक मुद्दे‘डीआरएम’कार्यालयात तणाव : अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अधिकाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या ट्रॅक मेन्टेनरने आत्महत्या केल्याची घटना घडली. ५ मार्चला आत्महत्या केल्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवलेला मृतदेह घेऊन संतप्त रेल्वे कर्मचारी ‘डीआरएम’ कार्यालयात पोहोचले. त्यांनी जोरदार नारेबाजी करीत दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.मृतदेह घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पारस किसनलाल मीना (३५) हा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील हिंगणघाटच्या चित्तोडा युनिट नंबर १ मध्ये ट्रॅक मेन्टेनर पदावर कार्यरत होता. पारसला वरिष्ठ विभाग अभियंता आर. के. रंजन, बंडू तेलंग हे नाहक त्रास देत होते. १ मार्चला ड्युटी संपल्यानंतर त्यांनी पारसकडून अधिक वेळ काम करून घेतले. पारसने ३ ते ५ मार्चपर्यंत सुटी घेऊनही त्यास गैरहजर असल्याचे दाखविले. त्याची तक्रार पारसने वरिष्ठ अधिकारी (एडीईएन) यांच्याकडे केली. परंतु त्याचे कुणीच न ऐकल्याने अखेर पारसने आपल्या घरी फाशी घेतली. आत्महत्येपूर्वी पारसने एक चिठ्ठी लिहिली. त्यात अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला. पारसचे मोठे भाऊ चंदालाल मीना यांनी सेवाग्राम पोलिसांना पारसने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्यात अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. गुरुवारी सायंकाळी मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेने ‘डीआरएम’ कार्यालय परिसरात आणला. तेथे त्यांनी दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी जोरदार नारेबाजी केल्यामुळे बराच वेळ ‘डीआरएम’ कार्यालय परिसरात तणाव होता. संतप्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरही प्रश्नांचा भडीमार करून मृताच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली.अधिकाऱ्यांचे निलंबन : ‘डीआरएम’मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या प्रकरणात संबंधित अधिकारी आर. के. रंजन, बंडू तेलंग यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मृताचे कुटुंबीय मृतदेह राजस्थानला घेऊन जात असल्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकरीबाबत नियमानुसार जे शक्य होईल ती मदत करण्यात येईल.’दहा लाख भरपाईची मागणी‘डीआरएम’ कार्यालयाच्या परिसरात नारेबाजी करीत असलेल्या संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्याची तसेच मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये भरपाई आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांना केली. गुप्ता यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर