शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 22, 2017 02:15 IST

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात असा समज आहे.

बलात्काराच्या ६६ प्रकरणांची नोंद : हुंड्याने घेतला ६४ महिलांचा जीव नागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात ६६ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली तर ६४ महिलांचा हुंड्याच्या कारणामुळे बळी गेला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीण मध्ये २०१६ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ४१६ गुन्हे नोंदविण्यात आले. १७५ महिलांवर बलात्कार झाला तर २८ महिलांची ‘चेन स्नॅचिंग’ झाली. शिवाय अपहरणाचे १११ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत ग्रामीण भागात चोरीच्या ९६५ प्रकरणांची नोंद झाली. तर खुनांचे प्रमाण ४५ इतके होते. या कालावधीत ४४ ठिकाणी जबरी चोरी झाल्या तर ४ ठिकाणी दरोडे पडले. विविध कारवायांमध्ये १ हजार ९४३ किलो इतरे अफू, गांजा तसेच इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत १ कोटी ९३ लाख ७२ हजार ९७० रुपये इतकी होती. तर विविध अपघातांमध्ये ३७४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.(प्रतिनिधी) दिवसाला एक आत्महत्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३६६ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक दिवसाला एका आत्महत्येची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.