शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

नागपुरात ट्रायल रन मेट्रोतून सिंधू व गोपीचंदचा प्रवास कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:28 IST

आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत.

ठळक मुद्देदुर्दैवी घटना घडली असती तर कोण असते जबाबदार?

आॅनलाईन लोकमतनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह अन्य बॅडमिंटन खेळाडू मंगळवारी मेट्रो रेल्वेने साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मिहान डेपोमध्ये पोहोचले. ट्रायल रनवर धावणाऱ्या या रेल्वेतून पाच कि़मी.चा प्रवास करताना एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरले असते आणि महामेट्रो देशातील या महान खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत.नागपुरात आयोजित ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपकरिता आलेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद, किदकम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणीत मंगळवारी मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये पोहोचले होते. त्यासाठी त्यांनी साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वेने पाच कि़मी.चा प्रवास केला होता.नागपुरात मेट्रो रेल्वेचे सध्या ट्रायल रन सुरू आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनची(आरडीएसओ)चमू यावर लक्ष ठेवून आहे. आरडीएसओकडून हिरवी झेंडी आणि कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची(सीएमआरएस)मंजुरी मिळाल्यानंतरच मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. मेट्रोची रेल्वे, अ‍ॅटग्रेड सेक्शन अर्थात ५.६ कि़मी.चा ट्रॅक, वीज पुरवठा व्यवस्था नवीन आहे आणि त्याची प्रत्येक स्तरावर तपासणी सुरू आहे. अशास्थितीत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या बॅडमिंटन खेळाडूंना या नवीन ट्रॅकवर नवीन मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करून महामेट्रोने त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना? हा प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे.याप्रकरणी मत जाणून घेण्यासाठी महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेट्रो रेल्वेची हैदराबाद येथे पूर्वीच तपासणी झाली असून आवश्यक प्रमाणपत्र मिळाले आहे. नागपुरात आरडीएसओचा ट्रायल रन पूर्ण झाला आहे. खेळाडूंना ८० कि़मी. प्रति तास वेगाऐवजी १० ते १५ कि़मी. प्रति तास वेगाने मेट्रोने नेण्यात आले. यादरम्यान मेट्रोची सक्षम चमू सोबत होती.होर्डिंग ‘जैसे थे’, नव्याने लागलेमेट्रो पिलर्सचे विद्रूपीकरण अद्याप थांबलेले नाही. महामेट्रोने या पिलर्सवर सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे होर्डिंग लावले. हे होर्डिंग अजूनही हटलेले नाही तर त्याच्या बाजूला स्थानिक आमदाराने आपले होर्डिंग नव्याने लावले आहेत. अजनी चौक परिसरात मेट्रो पिलर्सवर हे होर्डिंग झळकत आहेत. विद्यार्थी दिवसाची शुभेच्छा देणाऱ्या या होर्डिंगवर आमदाराचे नाव नमूद आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा