शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

आता वाढविली जाताहेत क्वारंटाईन केंद्र : सिम्बॉयसिस कॉलेजमध्येही केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:55 IST

कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवानाडोंगरी केंद्राचा आपात स्थितीत वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शहरात सर्वप्रथम आमदार निवासात क्वारंटाईन कें द्र सुरू करण्यात आले. यासाठी २१० खोल्या आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर वनामती व रविभवन येथे केंद्र सुरू करण्यात आले. संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता लोणारा येथील फार्मसी कॉलेज येथे सुद्धा संशयितांना ठेवण्यात आले. यादरम्यान वानाडोंगरी येथील विद्यार्थी वसतिगृहाला केंद्राचे स्वरूप देण्यात आले. परंतु नागरिकांचा विरोध लक्षात घेता येथे ठेवण्यात आलेल्या लोकांना शुक्रवारी दुसऱ्या केंद्रात नेण्यात आले. मात्र येथील केंद्र पूर्णपणे बंद केले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात गरज पडल्यास या केंद्रात संशयितांना ठेवले जाणार आहे. दरम्यान क्वारंटाईन केंद्रावरील वाढता भार व संशयितांची वाढती संख्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने १० हजार लोकांना क्वारंटाईन ठेवता येईल, अशी तयारी केली आहे. सध्या शहरात ७ क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व व्हीएनआयटी परिसरातही केंद्र सुरू करण्याचा विचार होऊ शकतो.हॉटेलमध्ये फक्त १५ नागरिकशहरातील १५हॉटेल चालकांनी माफक दरात संशयित लोकांना ठेवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार नॉन एसी रूम साठी ५०० रुपये, एसी रुमसाठी १ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले होते. मोठ्या हॉटेलने यासाठी १५०० रुपये दर ठरविले होते .परंतु आजवर या हॉटेलमध्ये फक्त १५ जण वास्तव्यास आहेत. यातील सहा जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते घरी गेले आहेत. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू यांनी सांगितले की, परिस्थिती बघून पुढील तयारी केली जाईल. नाागरिक आल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाल कळविले आहे.केंद्रनिहाय स्थितीआमदार निवास- ३०३वनामती -९७रविभवन- ४०लोणारा -१२सिम्बॉयसिस- ७०हॉटेल -९वानाडोंगरी- १२४एकूण- ६५५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर