शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख किमतीच्या आतील औषधांचीच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:49 IST

औषधे खरेदी व पुरवठ्याचे अधिकार देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने तीन लाख खर्चाच्या आतील औषधांचीच खरेदी करण्याचे अजब अधिकार ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला’ (इएसआयसी) दिले आहेत. या निर्णयाने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व वॉर्डात ज्या औषधे नेहमी लागतात त्यांचा तुटवडा पडला असून रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्दे‘हाफकिन’चा अजब निर्णय : ‘इएसआयसी’ रुग्णालयात औषधांचा तुटवडा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधे खरेदी व पुरवठ्याचे अधिकार देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने तीन लाख खर्चाच्या आतील औषधांचीच खरेदी करण्याचे अजब अधिकार ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला’ (इएसआयसी) दिले आहेत. या निर्णयाने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व वॉर्डात ज्या औषधे नेहमी लागतात त्यांचा तुटवडा पडला असून रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. परंतु शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न पडला आहे. रुग्णालात गेल्या चार महिन्यांपासून औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. सूत्रानुसार, ‘लोकमत’च्या वृत्ताला घेऊन पावसाळी अधिवेशनात कामगार आयुक्त व राज्य कामगार विमा योजनेचे संचालक यांनी ‘हाफकिन कंपनी’ला औषधे पुरवठा सुरळीत होईपर्यंत औषध खरेदीचे अधिकार देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला घेऊन हाफकिन कंपनीने ज्या औषधावर वर्षभरात तीन लाखांच्या आत खर्च होतो अशीच औषधे खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाला दिले. परंतु ‘अ‍ॅस्प्रीन’ सारख्या औषधांची खरेदीच तीन लाखांवर जात असल्याने रुग्णालय प्रशासन संकटात सापडले आहे. ही औषधे हाफकिन कंपनीच खरेदी करून पुरवठा करणार आहे. परंतु तूर्तास तरी या कंपनीकडून एकही गोळी मिळाली नसल्याची माहिती आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. औषधांच्या तुटवड्याला घेऊन रोज डॉक्टर व रुग्णांशी वाद होत आहे.२५० औषधांच्या खरेदीचे अधिकारच नाहीतप्राप्त माहितीनुसार, कामगार विमा रुग्णालयात विविध प्रकारातील साधारण ४०० औषधे लागतात. यातील तीन लाखांपेक्षा कमी खर्चाची १५० औषधे आहेत. केवळ याच औषधांच्या खरेदीचे अधिकार देण्यात आले आहे. उर्वरित २५० वर औषधे खरेदी करण्याचे अधिकार नाहीत. हाफकिन कंपनीकडून औषधे मिळत नाही. यामुळे रुग्णालय चालवायचे कसे, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.कामगार विमा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून इन्सुलिन नाही. यामुळे मधुमेहाचे गंभीर रुग्ण अडचणीत आले आहेत. येथील रुग्णांना बाहेरून इन्सुलिन घेणेही परडवणारे नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे, उपचारासाठी वेतनातून पैसे कापूनही औषधे दिले जात नसले तर रुग्णालय चालविताच कशाला, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा आहे. रुग्णाचा जीव गेल्यास मंत्री व आयुक्त जबाबदार राहतील का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी