शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुण्याच्या विवाहित प्रेमीयुगुलाची महागावात आत्महत्या

By admin | Updated: October 16, 2014 00:53 IST

एका विवाहित प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना महागाव येथील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असून ते एका

महागाव (यवतमाळ) : एका विवाहित प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना महागाव येथील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असून ते एका वाहनाने महागाव तालुक्यात आले होते. जयश्री दीपक भोंगाडे (३१) रा. खुरपुडी ता. खेड आणि एकनाथ तुकाराम चौधरी (४२) रा. निमगाव ता. खेड अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघेही विवाहित असून जयश्रीला तीन मुले तर एकनाथला दोन अपत्ये आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दोघेही महागाव तालुक्यातील काळीटेंभी परिसरात एका वाहनाने संशयास्पदरित्या फिरत होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी महागाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी बोलाविले. दोघेही विवाहित आणि सज्ञान असल्याने दोघांनाही सोडून दिले. तसेच दोघांच्या घरच्यांनाही माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांनीही महागाव येथील स्मशानभूमी गाठली. रात्री तेथे दोघांनीही विष प्राशन केले. बुधवारी सकाळी काही नागरिकांंना स्मशानभूमीत हे दोघे अत्यवस्थ आढळून आले. त्यापैकी एकनाथचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर अत्यवस्थ स्थितीत जयश्रीला सवना येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ज्या वाहनाने हे दोघेही आले होते ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईकही महागावात पोहोचले. शवविच्छेदनानंतर दोन्ही प्रेते ताब्यात घेऊन ते पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे दोघेही मोलमजुरी करणारे असून दिग्रस तालुक्यातील विठोली येथील मजुरांच्या ओळखीने या परिसरात आले होते. मात्र गावकऱ्यांनी पोलिसांना तसेच नातेवाईकांना माहिती दिल्याने आपली बदनामी होईल या भीतीतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)