शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama attack: पाकविरोधात संपूर्ण विदर्भात संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:51 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशहिदांना जागोजागी श्रद्धांजली : कठोर व तत्पर प्रत्युत्तर देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.नागपुरात सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी खा.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले इत्यादींच्या उपस्थितीत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. नागपुरात जागोजागी निदर्शने करण्यात आली. नागपूरसोबतच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम येथे देखील नागरिकांनी या हल्ल्याविरोधात आपला संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी उपस्थितांनी मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सोबतच काही जिल्ह्यात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत शहीद जवान अमर रहे अशाही घोषणा दिल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाagitationआंदोलन