शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ला : सरसंघचालकांनी खुलासा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 10:07 IST

पुलवामा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले.

ठळक मुद्देकोणत्या उपाययोजना केल्या?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले. त्याबाबत देशभरात बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु असा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. तेव्हा सरकारने यासंदर्भात कॅबिनेटची बैठक बोलावली का, डिफेन्सची बैठक घेतली का, घेतली असेल तर कुठल्या उपाययोजना केल्या, हल्ला झाला म्हणजे या माहितीकडेच दुर्लक्ष केले का, असे प्रश्न निर्माण होतात. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले.आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचे उत्तर देणार नाहीत. नितीन गडकरी हे पंतप्रधानानंतर भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. तसेच त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रश्न विचारत आहोत. आंबेडकर यांनी पत्रकारांना एक नोट सादर करीत ती वाचून दाखवली. तीत नोट अतिशय अर्जंट असल्याचे लिहिले होते. तसेच काश्मीरमध्ये हल्ला होणार असल्याचे सांगत सैनिकांची ये-जा असते त्याबाबत सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ही नोट सुरक्षा दलातील सर्व प्रमुखांना आणि सरकारकडेही आली होती, असा दावा त्यांनी केला. पत्रपरिषदेला ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, सागर डबरासे, एमआयएमचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

भाजप-सेना आणि वंचित बहुजन आघाडीत लढतमहाराष्ट्रात भाजप-सेना युती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. काँग्रेस कुठेही नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला. काँग्रेसचे सध्या आरएसएसकरण होत असून नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे डमी उमेदवार असल्याची टीका त्यांनी केली.

सोलापूरमुळे १४ जागी आम्ही चांगल्या स्थितीतधनगर समाजाने सर्वप्रथम राजकीय उठाव केला, तो सोलापूर येथून. वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ तेथेच रोवल्या गेली. त्यामुळे मला तेथूनच निवडणूक लढवायची होती. सोलापूर येथून निवडणूक लढवित असल्याने आम्ही १४ ठिकाणी चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक