शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 07:00 IST

पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.

ठळक मुद्देसंघ वर्तुळातून तीव्र संतप्त भावनाभारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवा

नागपूर : पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर जशात तसे उत्तर द्या, अशी मागणीच केली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले आहे.

आम्ही आजवर खूप झेलले आहे. आजचा दहशतवादी हल्ल्याचा प्रसंगदेखील तसाच अहे. मागील दोन ते तीन वेळा जशास तसे उत्तर देण्यात आले. त्यामुळे एक विश्वास वाढला होता. सैनिकांवर झालेला हल्ला हा भ्याड असून आता प्रत्युत्तर दिलेच गेले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.

वाढत्या कारवाईमुळे भ्याड पाऊलसंघातर्फे ‘ ट्विटर’वरदेखील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात होत असलेल्या कारवाईमुळे आलेली निराशा व हताशा या भ्याड हल्ल्यातून दिसून येत आहे. या घटनेतील दोषींना धडा शिकविण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. तर या परिस्थितीत संघ सैन्यदल व सरकारसोबत आहे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये : राष्ट्रसेविका समितीदरम्यान, संघ परिवारातील विविध संघटनांनी या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या जवानांच्या कुटुंबियांसमवेत संपूर्ण समाज उभा ठाकला पाहिजे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. यासाठी सरकारने या हल्ल्याचे योग्य उत्तर देत कठोर पावले उचलली पाहिजेत, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सितागायत्री अन्नदानम् यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला