शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व! कच्चा मालाची करतात साठवणूक, स्टॉक मर्यादेची तपासणी करण्याची मागणी 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 19, 2023 19:22 IST

वाढत्या महागाईने सामान्य ग्राहक आधीच त्रस्त आहेत. त्यातच डाळींच्या वाढत्या किमतीने त्यात भर टाकली आहे.

नागपूर : वाढत्या महागाईने सामान्य ग्राहक आधीच त्रस्त आहेत. त्यातच डाळींच्या वाढत्या किमतीने त्यात भर टाकली आहे. तूर डाळ किरकोळ बाजारात १३५ ते १४५ रुपये किलो विकली जात आहे. डाळींच्या व्यवसायावर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असल्यामुळे दर भरमसाठ वाढल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप आहे. 

डाळींवर मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असून कच्च्या मालाची मर्यादेबाहेर साठवणूक करून जास्त दरात विक्री करीत आहेत. या कंपन्यांवर राज्य सरकारने छापे टाकावेत आणि अवैध साठा बाजारात विक्रीस आणावा, अशी व्यापारी संघटनांची मागणी आहे. केवळ लहान व्यापाऱ्यांना स्टॉकची सक्ती ग्राहकांना किफायत दरात डाळ मिळावी म्हणून सरकारने लहान व्यापाऱ्यांना पोर्टलवर स्टॉकची माहिती देण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे डाळींचा मर्यादेबाहेर स्टॉक करणाऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांवर कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. डाळींच्या वाढत्या दरामुळे राज्य सरकार व्यापाऱ्यांचे गोडाऊन, कोल्ड स्टोरेज आणि दाल मिलर्सच्या स्टॉकवर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे मोठ्या कंपन्या डाळींची मनमानी किंमत वसूल करीत असल्यानंतरही त्यांच्यावर नियंत्रण नाही. यावरून या कंपन्यांना सरकारने भाव वाढविण्याची सूट दिल्याचे दिसून येते. त्यांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी आणि जप्ती होत नाहीच. ही बाब चुकीची असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

घाऊकमध्ये भाव कमी, किरकोळमध्ये जास्ततूर डाळ दर्जानुसार विकली जाते. ठोक बाजारात भाव १२५ रुपये किलो आहे. या कंपन्यांद्वारे मॉलमध्ये १५० रुपये वसूल केले जात आहेत. किरकोळमध्ये भाव १३० ते १४५ रुपये आहेत. त्यानंतरही लोकांच्या ताटातून डाळ गायब आहे.

मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकची तपासणी करावीहोलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, बाजारात कायदा केवळ लहान व्यापाऱ्यांसाठीच असल्याचे दिसून येते. मोठ्या कंपन्यांना लुटण्याची खुली सूट दिली आहे. सध्या मोठ्या कंपन्यांनी धान्याच्या बाजारावर कब्जा मिळविला आहे. मोठ्या कंपन्यांच्या भावावर सरकारचे नियंत्रण नाही. ते हवी तशी किंमत ग्राहकांकडून वसूल करतात. सरकार केवळ लहान व्यापाऱ्यांवर बळजबरी करून स्टॉक मर्यादेची तपासणी करीत आहे. सरकारला खरंच स्टॉकची तपासणी करायची असेल तर आधी मोठ्या कंपन्यांची करावी. त्यानंतरच डाळीच्या किमती नियंत्रणात येतील. लहान व्यापाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणून त्रास दिला जात आहे. त्याचा फायदा मोठ्या कंपन्या उचलत आहेत.

मोठ्या कंपन्या थेट शेतातून विकत घेतात मालमोठ्या कंपन्या कच्चा आणि प्रोसेस माल थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात. कंपन्या स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन स्टॉक करतात. मोठ्या कंपन्यांचे संपूर्ण भारतात स्टोरेज आहेत. हा प्रकार उघड्या डोळ्याने दिसत असतानाही सरकार या कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचा कुठलाही प्रयत्न करीत नाहीत. या कंपन्यांच्या स्टॉकची सक्तीने तपासणी करावी. वेळेप्रसंगी छापेही टाकावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :nagpurनागपूरInflationमहागाईMarketबाजार