शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गुगल मॅपवर दिसणार नागपुरातील सार्वजनिक शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 11:54 IST

नागपूर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसणार आहेत.

ठळक मुद्दे शहरात ओडीएफ डबल प्लस मानांकनासाठी दर्जेदार सुविधा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हागणदारीमुक्तीत शहराला ओडीएफ प्लस मानाकंन प्राप्त झाले आहे. आता सर्वोच ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त व्हावे, यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत झाली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयेही गुगल मॅपवर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसणार आहे.शहरातील शौचालये गुगल मॅपवर दिसल्यास लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी शौचालयात तक्रार नोंदवही ठेवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छतेसंदर्भात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गंभीर असावे. यात हलगर्जीपणा केल्याचे आढळुन आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.नागपूर शहराला ओडीएफ प्लस मानांकन मिळाले आहे. आता शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शौचालयामागे एक नोडल अधिकारी, जमादार, स्वच्छता कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.या सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या झोनल अधिकारी व सहायक आयुक्तांनी नियंत्रण ठेवावयाचे आहे. बहुसंख्य शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे शौचालयातील नळाला पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले आहे.शौचालयात ओलसरपणा राहणार नाही यासाठी फरशी कोरडी करून स्वच्छ ठेवा,तसेच कचरापेटीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. पाणी गळतीची जागा शोधून त्याठिकाणी डागडुजी करण्यात यावी, संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याचे निर्देश अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

टॅग्स :googleगुगल