शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख अधिकारी : अश्विन मुद्गल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:25 IST

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे. एक पारदर्शी व लोकाभिमुख कारभारासह प्रयोगशील अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपूर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक वर्ष त्यांनी मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. ते सध्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांनी वेग घेतला आहे. प्रशासकीय कौशल्य, जनतेशी जुळलेली नाळ, कामाची हातोटी आणि सदैव कामासाठी तत्पर असलेले मुद्गल आदर्श अधिकारी म्हणून गणले जातात.मनपा आयुक्त असतांना त्यांनी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी ‘न्युसन्स डिटेक्शन स्क्वॉड ’निर्माण केले. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना दंड आकारण्याचे काम हे पथक करायचे. त्यांच्याच कार्यकाळात केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराला ‘हागणदारी मुक्त’शहर घोषित केले. ‘स्वच्छ नागपूर’कडे शहराची वेगाने घौडदौड सुरू आहे. शहरातील गरजू व गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने २९ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण हाती घेण्यात आली आहे. यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारवर अधिक लक्ष दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पांदण रस्ते बांधण्याचे नियोजन करून प्रत्येक तालुक्याला टार्गेट ठरवून दिले आहे. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नागपुरात प्रत्यक्ष बंधकामाला सुरुवात त्यांच्याचमुळे शक्य झाले आहे. त्यांच्याच नेतृत्वात आर्थिक स्थितीतून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी थकीत कर वसुलीसाठी थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात आली. ७० टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर निर्धारणाची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कारभारात पारदर्शता आणली. राज्य सरकार व महमंडळाकडे प्रलंबित असलेला महापालिकेचा निधी प्राप्त क रण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश मिळाले.गणेशोत्सवात शहरातील तलाव व नद्यांचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होते. याला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या विविध भागात २०० कृत्रिम टँक तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून विसर्जनाची घरपोच व्यवस्था करण्यात आली. यामुळे भाविकांची सुविधा झाली. सोबतच प्रदूषणालाही आळा बसला. दीक्षाभूमी येथील कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. गर्दी विचारात घेता परिसराची स्वच्छता व उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहरात दररोज ४०० ते ४५० एमएलडी सांडपाणी निर्माण होते. यातील १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून महाजनकोला दिले जाते. यातून वर्षाला महापालिकेला १५ कोटी मिळतात. पुन्हा २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांनी या प्रकल्पाला गती मिळाली आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वीज निर्मिती प्रकल्पात वापर केला जााणार आहे. यातून महापालिकेला वर्षाला २० कोटींचे उत्पन्न होणार आहे. अशा प्रकारे सांडपाण्यातून वर्षाला ३५ कोटी मिळणार आहे.नियमित घेतात विकासकार्यांचा आढावाअश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात ‘स्मार्ट सिटी’चा महत्वाचा भाग असलेल्या शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना गती मिळाली. कविवर्य सुरेश भट सभागृहाचे काम रखडले होेते. अश्विन मुदगल यांनी प्रत्येक आठवड्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊ न अत्याधुनिक अशा सभागृहाचे काम पूर्ण केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. नागनदी प्रकल्प व ऑरें सिटी स्ट्रीट  प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे. शहरातील महापालिके च्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप केले जाणार आहे. ते प्रत्येक विकासकामात जातीने स्वत: लक्ष घालतात व नियमितपणे विकासकार्यांचा आढावा घेतात.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट