शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

प्रसार माध्यमांनी मानवाधिकाराची जनजागृती करावी

By admin | Updated: September 15, 2015 06:08 IST

मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार

नागपूर : मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) सिरियाक जोसेफ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज, मीडिया व मानव अधिकारांसमोरील आव्हाने : एक संवाद’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शरदचंद्र सिन्हा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मानवाधिकार आयोगाचे सहायक संचालक डॉ. सरोजकुमार शुक्ला, सहसचिव डॉ. रंजित सिंह, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको म्हणून मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये ही मानवाधिकाराची जबाबदारी आह,े असे प्रतिपादन जोसेफ यांनी केले. मानवी जीवनावर प्रसार माध्यमांचा फार मोठा प्रभाव आहे. एका अर्थाने प्रसार माध्यमं ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी समाजकार्याची भूमिका जिवंत ठेवावी, असे मत प्रा. गिरीश्वर मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजित सिंह यांनी तर आभार डॉ. अधरा देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)