शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

नागपुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला चढवणारा माथेफिरू गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:30 IST

लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली.

ठळक मुद्देउल्हासनगरला पळाला होताबडनेरा स्थानकावर केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. मात्र, तो उल्हासनगर येथे दडून बसला होता. पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याला नागपूरकडे येण्यास बाध्य करून बडनेरा (जि. अमरावती) स्थानकावर अटक केली.आरोपी हेमनानी खामल्यातील सिंधी कॉलनीतील रहिवासी आहे. लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सानिकासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपासून तो सानिकावर संशय घेऊ लागल्याने तिने त्याला टाळणे सुरू केले. यातून दोघांत वाद झाला अन् त्यांचे ब्रेकअपही झाले. मात्र, शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला रविवारी १ जुलैला वारंवार फोन केले. त्यामुळे तिने त्याला तिचे मामा अविनाश पाटणे यांच्या फायनान्स कार्यालयात येण्यास सांगितले. तेथे आल्यानंतर त्याने तिला बाहेर चलण्याचा आग्रह धरला. मात्र, सानिकाने मामा-मामींच्या उपस्थितीतच जे काय बोलायचे ते बोल, असे त्याला सुनावले. त्यानंतर त्याने सानिकाला ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’, असा प्रश्न करून तिच्याशी वाद घातला. हे सुरू असताना काही कळायच्या आतच लपवून ठेवलेला कट्यारसारखा चाकू बाहेर काढून आरोपीने सानिकावर सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ते पाहून तिचे मामा अविनाश मध्ये धावले असता आरोपीने त्यांच्याही हातावर चाकू मारला. अशा प्रकारे दोघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी हेमनानी पळून गेला. अत्यंत वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. गंभीर अवस्थेतील सानिकाला देवनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.मध्यस्थाची मदत झालीदरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी बजाजनगर तसेच गुन्हे शाखेची पथके ठिकठिकाणी शोधाशोध करीत होती. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी खामल्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडेही संपर्क केला. सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीच्या आईवडिलांना आरोपीला तातडीने पोलिसांच्या हवाली केले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असा दम दिल्याने दिला. दरम्यान, सोमवारी दुपारी आरोपीच्या आईवडिलांना आरोपीच्या मावसभावाचा फोन आला. रोहित हेमनानी उल्हासनगर (ठाणे) मध्ये असून, त्याला पैशाची गरज असल्याचे सांगितले. ही माहिती कळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला नागपूरकडे पाठविण्यास बजावले. इकडे पोलिसांसोबत आरोपीच्या मामाला पाठविण्यात आले. रात्री उशिरा आरोपी बडनेरा स्थानकावर पोहचताच मामाने त्याला खाली उतरवून घेतले आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. मंगळवारी सकाळी आरोपीला नागपुरात आणण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर त्याची चौकशी सुरू होती.

टॅग्स :Crimeगुन्हा