शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजी रस्त्यावर फेकणार्‍या पीएसआयची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 21:24 IST

Throwing vegetables on the road, PSI's inquiry स्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना पोलीस आयुक्तालयातून आज 'शोकॉज नोटीस'ही बजावण्यात आली आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये उमटलेल्या वृत्तामुळे या घटनेचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. शहर पोलीस दलानेही त्यांच्या ट्विटरवर संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर 'लोकमत'चे वृत्त आणि व्हिडिओ व्हायरल : पोलिसांकडूनही घटनेचा निषेध, दखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना पोलीस आयुक्तालयातून आज 'शोकॉज नोटीस'ही बजावण्यात आली आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये उमटलेल्या वृत्तामुळे या घटनेचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. शहर पोलीस दलानेही त्यांच्या ट्विटरवर संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जगण्या-मरण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक गर्दी करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढतो. जरीपटक्यात मंगळवारी आठवडी बाजारात अशाच प्रकारे एका महिलेने रस्त्यावर भाजीचे दुकान लावले होते. तेथे ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. लोकमतने त्यासंबंधीचे वृत्त आज प्रकाशित केले. त्यामुळे चोहोबाजूने निषेधाचा सूर उमटला. ट्विटर, व्हाॅट्सॲपसह सोशल मीडियावर लोकमतच्या वृत्ताचे कात्रण आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या घटनेचा चोहोबाजूने निषेध नोंदविण्यात आला. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार खांडेकर यांना शो काज नोटीस बजावण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवरही या घटनेच्या संबंधाने खुलासा करण्यात आला. "ही घटना निंदनीय असून संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असल्याचे त्यात म्हटले आहे.

उपायुक्तांकडून चौकशी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून उपनिरीक्षक खांडेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

टॅग्स :PoliceपोलिसAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा