शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

वसुलीभाई बनून आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:56 IST

क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथीदार रोहित लक्ष्मीचंद गुल्लानी (वय २३, फवारा चौक, मूल, जि. चंद्रपूर) तसेच रितिक हिम्मत मेश्राम (वय २३, रा. म्हारोडा, ता. मूल) यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.

ठळक मुद्दे११ जुलैपर्यंत पीसीआर : काडतूस, रिव्हॉल्व्हर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथीदार रोहित लक्ष्मीचंद गुल्लानी (वय २३, फवारा चौक, मूल, जि. चंद्रपूर) तसेच रितिक हिम्मत मेश्राम (वय २३, रा. म्हारोडा, ता. मूल) यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.खामल्यातील सिंधी कॉलनीत राहणारा कन्हैया हरिशचंद करमचंदानी (वय २७) याच्याकडे गुल्लानी आणि मेश्राम या बुकींचे आयपीएल सट्ट्याचे १ लाख २० हजार रुपये शिल्लक होते. त्यातील ३५ हजार करमचंदानीने आरोपींना दिले. ८५ हजार रुपये मिळावे म्हणून गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीच्या मागे तगादा लावला होता. तो रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, गुल्लानी आणि मेश्राम या दोघांनी चंद्रपूरच्या कंट्रोल रूममध्ये असलेला पीएसआय दिलीप लोखंडे याला सुपारी दिली. त्यानुसार पीएसआय लोखंडे, गुल्लानी आणि मेश्राम हे तिघे भाड्याची झायलो कार एमएच ३४/ २६९८ मध्ये बसून रविवारी भल्या सकाळी नागपुरात आले. गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीला घरातून कारजवळ आणले. कारमध्ये मागच्या सीटवर बसून असलेला पीएसआय लोखंडे याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तातडीने ८५ हजार रुपये मागितले. रक्कम दिली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांना उडवून देईल, अशी धमकीही दिली. करमचंदानीने काही तासांची मुदत मागितल्यानंतर आरोपी नागपुरात दारू पीत फिरत राहिले. दरम्यान, ४ वाजेपर्यंत त्यांनी वारंवार करमचंदानीला फोन करून पैसे मागितले. धमक्याही दिल्या. तिकडे करमचंदानीने प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार राजेंद्र पाठक यांनी एपीआय शिर्के तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने करमचंदानीच्या माध्यमातून रक्कम घेण्याच्या बहाण्याने बोलवून पीएसआय लोखंडे तसेच गुल्लानी आणि मेश्रामच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, चार काडतूस आणि मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली झायलो कारही जप्त केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.चंद्रपुरात खळबळआरोपी पीएसआय मूळचा मूल येथील रहिवासी असून, तो पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्याची पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहे. विभागीय परीक्षा देत दिलीप लोखंडे पीएसआय बनला. मात्र, त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. लज्जास्पद वर्तन केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वीच त्याला कामावर घेत चंद्रपूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली. गुल्लानी आणि मेश्राम मूलचे रहिवासी असून, बुकी तसेच अवैध दारूच्या व्यवसायात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत लोखंडेची सेटिंग होती. क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्याची सुपारी घेत लोखंडे नागपुरात आला आणि पोलीस कोठडीत पोहचला. त्याला अटक झाल्याचे वृत्त स्थानिक अधिकाऱ्यांकडून चंद्रपूरच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना ते कळताच त्यांनी रविवारी रात्रीच लोखंडेला निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस