शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रेरामधील तरतुदी प्लॉटधारकांच्या हिताच्याच : रमेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:22 IST

हाऊसिंग सोसायटीचा सदस्य या नात्याने प्लॉट आणि फ्लॅटधारकासाठी रेरामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. त्या हिताच्या असल्याने समजून त्याचा लाभ घ्या आणि आपले कायदेशीर अज्ञान दूर करून भविष्यातील तांत्रिक अडचणींपासून निश्चिंत राहा, असे आवाहन महासेवाचे राज्याध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी केले.

ठळक मुद्देकार्यशाळेतून प्रबोधन : महासेवाचा नि:शुल्क उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाऊसिंग सोसायटीचा सदस्य या नात्याने प्लॉट आणि फ्लॅटधारकासाठी रेरामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. त्या हिताच्या असल्याने समजून त्याचा लाभ घ्या आणि आपले कायदेशीर अज्ञान दूर करून भविष्यातील तांत्रिक अडचणींपासून निश्चिंत राहा, असे आवाहन महासेवाचे राज्याध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी केले.महासेवा आणि डीजीसी वर्ल्ड लिगल अ‍ॅडव्हर्टायर्जसच्या संयुक्त विद्यमाने नागपूरकरांसाठी शनिवारी नि:शुल्क कार्यशाळा पार पडली. त्या प्रसंगी प्रभू बोलत होते. यावेळी नागपूर महासेवाचे मुख्य कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. आनंदप्रकाश दुबे, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष रामराव वानखेडे, सचिव एस.के. कोंगे, नागपूर महासेवाचे अध्यक्ष सीए श्रीकांत दुबे, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष पन्नासे प्रामुख्याने उपस्थित होते.तीन तास चालेल्या या कार्यशाळेमध्ये रमेश प्रभू यांनी मोफा, रेरा विषयक तसेच विविध कायदे आणि नव्या तरतुदींची माहिती दिली. ते म्हणाले, हाऊसिंग सोसायटीच्या तरतुदीमध्ये २०१६ मध्ये कलम १७ नुसार बदल करण्यात आला आहे. हा कायदा लोकांच्या हिताचा आहे. हाऊसिंग सोसायटीचे रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टअंतर्गतच करावे. हाऊसिंग सोसायटी आवश्यकच असते. रेरामध्ये असलेल्या प्रावधानानुसार जमीन मालक एकटा न राहता ती सोसायटी बनते. कॉमन एरियाचा मालकी हक्कही सोसायटीकडे असतो. या सोसायटी अंतर्गत असलेल्या अनेक कायद्यांचा लाभ प्लॉटधारकांना मिळतो. महाराष्ट्र ओनरशिप अ‍ॅक्ट अंतर्गत बिल्डरने चार महिन्यात कन्व्हेक्शन द्यावे अशी तरतूद आहे. जिल्हा उपनिबंधकाची यात महत्त्वाची जबाबदारी असते.कार्यशाळेत आनंद दुबे यांनी प्लॉट खरेदीदारांचे हक्क, अधिकार, अपॉर्टमेंट अ‍ॅक्टमधून को-ऑपरेटिव्ह अ‍ॅक्टमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत व फायदे, निवडणूक आणि संयोजन या संदर्भात माहिती दिली. तर श्रीकांत दुबे यांनी अकाऊंट ऑडिट आणि रिटर्न या संदर्भात मार्गदर्शन केले. एस.के. कोंगे यांनी प्रास्ताविकातून पार्श्वभूमी सांगितली. बदलत गेलेले नियम आणि कायद्यातील तरतुदींची त्यांनी माहिती दिली. आभार प्रदीप बडगैया यांनी मानले. कार्यशाळेला शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.नागपुरात फक्त १०० हाऊसिंग सोसायट्या कार्यरतनागपूर जिल्हा आणि शहर झपाट्याने वाढत असले तरी १५ हजार हाऊसिंग सोसायट्यांचे रजिस्ट्रेशन आहे. त्यातील ५०० सोसायट्या अवसायनात निघाल्या असून फक्त १०० कार्यरत आहेत. मुंबई शहरात ३५ हजार सोसायट्या रजिष्टर्ड असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017