रेरामधील तरतुदी प्लॉटधारकांच्या हिताच्याच : रमेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:21 AM2019-11-24T00:21:23+5:302019-11-24T00:22:45+5:30

हाऊसिंग सोसायटीचा सदस्य या नात्याने प्लॉट आणि फ्लॅटधारकासाठी रेरामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. त्या हिताच्या असल्याने समजून त्याचा लाभ घ्या आणि आपले कायदेशीर अज्ञान दूर करून भविष्यातील तांत्रिक अडचणींपासून निश्चिंत राहा, असे आवाहन महासेवाचे राज्याध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी केले.

The provisions in Rera are in the interest of the plot holders: Ramesh Prabhu | रेरामधील तरतुदी प्लॉटधारकांच्या हिताच्याच : रमेश प्रभू

महासेवाच्या वतीने आयोजित गृहनिर्माण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रमेश प्रभू. उपस्थित श्रीकांत दुबे, अ‍ॅड. आनंदप्रकाश दुबे आणि एस.के. कोंगे, रामराव वानखेडे आणि पन्नासे.

Next
ठळक मुद्देकार्यशाळेतून प्रबोधन : महासेवाचा नि:शुल्क उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हाऊसिंग सोसायटीचा सदस्य या नात्याने प्लॉट आणि फ्लॅटधारकासाठी रेरामध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. त्या हिताच्या असल्याने समजून त्याचा लाभ घ्या आणि आपले कायदेशीर अज्ञान दूर करून भविष्यातील तांत्रिक अडचणींपासून निश्चिंत राहा, असे आवाहन महासेवाचे राज्याध्यक्ष सीए रमेश प्रभू यांनी केले.
महासेवा आणि डीजीसी वर्ल्ड लिगल अ‍ॅडव्हर्टायर्जसच्या संयुक्त विद्यमाने नागपूरकरांसाठी शनिवारी नि:शुल्क कार्यशाळा पार पडली. त्या प्रसंगी प्रभू बोलत होते. यावेळी नागपूर महासेवाचे मुख्य कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. आनंदप्रकाश दुबे, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष रामराव वानखेडे, सचिव एस.के. कोंगे, नागपूर महासेवाचे अध्यक्ष सीए श्रीकांत दुबे, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष पन्नासे प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन तास चालेल्या या कार्यशाळेमध्ये रमेश प्रभू यांनी मोफा, रेरा विषयक तसेच विविध कायदे आणि नव्या तरतुदींची माहिती दिली. ते म्हणाले, हाऊसिंग सोसायटीच्या तरतुदीमध्ये २०१६ मध्ये कलम १७ नुसार बदल करण्यात आला आहे. हा कायदा लोकांच्या हिताचा आहे. हाऊसिंग सोसायटीचे रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टअंतर्गतच करावे. हाऊसिंग सोसायटी आवश्यकच असते. रेरामध्ये असलेल्या प्रावधानानुसार जमीन मालक एकटा न राहता ती सोसायटी बनते. कॉमन एरियाचा मालकी हक्कही सोसायटीकडे असतो. या सोसायटी अंतर्गत असलेल्या अनेक कायद्यांचा लाभ प्लॉटधारकांना मिळतो. महाराष्ट्र ओनरशिप अ‍ॅक्ट अंतर्गत बिल्डरने चार महिन्यात कन्व्हेक्शन द्यावे अशी तरतूद आहे. जिल्हा उपनिबंधकाची यात महत्त्वाची जबाबदारी असते.
कार्यशाळेत आनंद दुबे यांनी प्लॉट खरेदीदारांचे हक्क, अधिकार, अपॉर्टमेंट अ‍ॅक्टमधून को-ऑपरेटिव्ह अ‍ॅक्टमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत व फायदे, निवडणूक आणि संयोजन या संदर्भात माहिती दिली. तर श्रीकांत दुबे यांनी अकाऊंट ऑडिट आणि रिटर्न या संदर्भात मार्गदर्शन केले. एस.के. कोंगे यांनी प्रास्ताविकातून पार्श्वभूमी सांगितली. बदलत गेलेले नियम आणि कायद्यातील तरतुदींची त्यांनी माहिती दिली. आभार प्रदीप बडगैया यांनी मानले. कार्यशाळेला शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागपुरात फक्त १०० हाऊसिंग सोसायट्या कार्यरत
नागपूर जिल्हा आणि शहर झपाट्याने वाढत असले तरी १५ हजार हाऊसिंग सोसायट्यांचे रजिस्ट्रेशन आहे. त्यातील ५०० सोसायट्या अवसायनात निघाल्या असून फक्त १०० कार्यरत आहेत. मुंबई शहरात ३५ हजार सोसायट्या रजिष्टर्ड असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: The provisions in Rera are in the interest of the plot holders: Ramesh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.