शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मंत्रालयासाठी ३० हजार कोटींची तरतूद करा : बबनराव तायवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:25 IST

राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार देशात व महाराष्ट्रातओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसी समाजाकरिता विविध योजना राबविण्यासाठी २०१६ मध्ये राज्यात प्रथमच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. परंतु गेल्या तीन वर्षात या विभागासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक तरतूद केली नाही. ओबीसी मंत्रालयासाठी शासनाने ३० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे युती सरकारने ओबीसीवर अन्याय केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार देशात व महाराष्ट्रातओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसी समाजाकरिता विविध योजना राबविण्यासाठी २०१६ मध्ये राज्यात प्रथमच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. परंतु गेल्या तीन वर्षात या विभागासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक तरतूद केली नाही. ओबीसी मंत्रालयासाठी शासनाने ३० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.१३ टक्के लोकसंख्या असलेल्या अनुसूचीत जाती करिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून १२,३०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या ७ टक्के असून आदिवासी विकास विभागासाठी १०,७०५ कोटींची तरतूद केली आहे. मात्र ३८० जातींचा समावेश व ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती ओबीसी विभागाकरिता २,८८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद तुटपुंजी असल्याने राज्य सरकारने ती ३० हजार कोटी करण्याची मागणी ओबीसी महासंघाने केली आहे. तसेच सभागृहातील ओबीसी व आमदार व मंत्र्यांनी यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.३ टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली. त्याच धर्तीवर ओबीसीसाठी ३० हजार कोटींची तरतूद करावी. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक सत्रासाठी वसतिगृह सुरू करावे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, विधिमंडळ ओबीसी समिती गठित करावी. ओबीसी आर्थिक विकास महांमडळाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष दूर करावा, सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालये सुरू करवी, या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाखापर्यंत वाढविण्यात यावी. विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रशिप योजना लागू करण्याची मागणी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सचिन राजूकर, अशोक जिवतोडे, शरद वानखेडे, संजय पन्नासे, गंनश्वर आरीकर, शकील पटेल, रोशन कुंभलकर, नीलेश कोंढे, मयूर वाघ आदींनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेOBCअन्य मागासवर्गीय जातीfundsनिधी