कॅप्शन : उद्योजक आणि व्यापाऱ्यांना पुरस्कार प्रदान करताना ना. अनिल देशमुख, ना. नितीन राऊत आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी.
नागपूर : शासनाच्या निर्देशाचे व्यापाऱ्यांनी पालन करावे, मास्क लावावे, सॅनिटायझरचा उपयोग करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाने संकटात असलेले व्यापारी देशाच्या अर्थव्यवस्थेत तसेच गरजूंना मदत करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये शासनाने जीएसटीमध्ये काही दिलासा दिला, तो पर्याप्त नाही. राज्य आणि केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या सक्षमतेसाठी लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली.
एनव्हीसीसीचे दिवाळी मिलन व सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि चांदीचे नाणे देऊन सत्कार केला. या प्रसंगी व्यवसायात अतुलनीय योगदान आणि समाजात उत्कृष्ट सेवा देणारे उद्योजक सोलर इंडस्ट्रीज (इं.) प्रा.लि.चे संचालक सत्यनारायण नुवाल यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय नितीका फार्मास्युटिकल प्रा.लि.चे संचालक सरदार रवलीन सिंग खुराण यांना विदर्भरत्न पुरस्कार तसेच रोकडे ज्वेलर्सचे संचालक भैय्याजी रामभाऊजी रोकडे, पाटणी ऑटोमोबाईल्सचे संचालक नरेश पाटणी, आहुजा पेन मार्टचे संचालक ओमप्रकाश आहुजा यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
अनिल देशमुख म्हणाले, व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चेंबरतर्फे सन्मानित करण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. चेंबरने राज्य शासनाच्या निर्देशांचा नेहमीच प्रसार व प्रचार केला आहे. या प्रसंगी खा. डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. सुधाकर देशमुख, जयप्रकाश गुप्ता, अभिजित वंजारी, नगरसेविका प्रगती पाटील, उज्ज्वला शर्मा, चेतना टांक, चेंबरचे माजी अध्यक्ष व कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, एनएचएआयचे राजीव अग्रवाल, सीजीएसटीचे महानिरीक्षक सुरेश रायलू, मध्य रेल्वेचे एडीआरएम अनुप सथपती, एमएसएमईचे संचालक प्रशांत पार्लेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल अहिरकर आणि चेंबरचे पदाधिकारी, हेमंत गांधी, कार्यकारिणी सदस्य, सर्व असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव, पदाधिकारी उपस्थित होते. चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनी आभार मानले.