शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसशी संबंधित वीज कंत्राटी कामगार संघाचे ठिय्या आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: August 24, 2024 18:43 IST

Nagpur : ऊर्जामंत्र्यांच्या निवासावर काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शनिवारी रेशीमबाग मैदानातून ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा संविधान चौकात अडवला. तेव्हा आंदोलकांनी चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान मागणी पूर्ण होत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांकडे कार्यरत कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करावे, वेतनवाढ व हरयाणा सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. शासनाकडेही बऱ्याचदा मागणी केली गेली. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

दरम्यान, या वीज कंपन्यांतील सुमारे ४५ हजार कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी शेवटी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने शनिवारी रेशीमबाग मैदानातून थेट ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले. हा मोर्चा संविधान चौकात पोलिसांनी रोखला. त्यानंतर आंदोलकांनी येथे ठिय्या देत आमरण उपोषण सुरू केले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी फडणवीस यांच्याशी देवगिरीवर बैठक घडवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, राहुल बोडके, अभिजित माहुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर