शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे संरक्षण आता ठेकेदारांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:06 IST

केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी शासनाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना केली होती. २०१३ मध्ये केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीवर प्रधान सचिवांनी केल्या होत्या. तेव्हा नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आता सेवा समाप्त करून शासन आता नव्याने भरती करीत आहे. पण यावेळी बालकाच्या संरक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आऊटसोर्सिंगद्वारे म्हणजेच ठेकेदारांकडून करणार आहे. त्यामुळे कर्मचारी समाधानकारक काम करून शासनाचा उद्देश सफल होणार नाही, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा बाल संरक्षणच्या नेमणुका ठेकेदारी पद्धतीवर : कार्यरत कर्मचाऱ्यांची केली जातेय सेवा समाप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी शासनाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना केली होती. २०१३ मध्ये केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीवर प्रधान सचिवांनी केल्या होत्या. तेव्हा नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आता सेवा समाप्त करून शासन आता नव्याने भरती करीत आहे. पण यावेळी बालकाच्या संरक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आऊटसोर्सिंगद्वारे म्हणजेच ठेकेदारांकडून करणार आहे. त्यामुळे कर्मचारी समाधानकारक काम करून शासनाचा उद्देश सफल होणार नाही, असे बोलले जात आहे.महिला व बालविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षात कर्मचाऱ्यांच्या १२ पोस्ट आहे. यातील २०१३ मध्ये नियुक्त केलेल्या बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) साधना हटवार व लेखापाल प्रफुल्ल ढोक यांची सेवा निवड समितीने सेवा समाप्त केली आहे. पण त्यापूर्वी साधना हटवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने याचिकेचा निकाल लागेपर्यंत त्यांची सेवा समाप्त करू नये किंवा दुसऱ्या एजन्सीमध्ये त्यांना स्थानांतरित करू नये असे आदेश दिले होते. तरीही निवड समितीने त्यांची सेवा समाप्त केली. निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहे. राज्यभरात या कक्षाला संचालित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करून, नव्या नियुक्त्या बाह्य यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी धास्तावले आहे.जिल्हा बाल संरक्षण केंद्रातर्फे बाल लैंगिक अत्याचार, बालविवाह, बालकामगार, बाल भिक्षेकरी, रस्त्यावर फिरणारी बालके, कुमारी माता, दत्तक विधानाची गरज असलेली बालके, विशेष काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके, विधीसंघर्षग्रस्त बालके, निराधार बालकांच्या समस्येवर प्रभावीपणे काम केले जाते. या कक्षामुळे बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. गेल्या ५ वर्षापासून हे कर्मचारी बालकांसाठी आपल्या सेवा देत होते. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करून, आऊटसोर्सिंगद्वारे नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.ठेकेदाराकडून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची पिळवणूकया कक्षात कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जिल्ह्यात फोरम फॉर क्रिएटीव्हीटी इंटरप्रीन्यूअरशिप या संस्थेला नियुक्त केले आहे. संस्थेमार्फत आऊटरिच वर्कर व संगणक चालक नियुक्त करण्यात आले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांची वेतनात पिळवणूक होत आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनातून १८ टक्के जीएसटी व ५०० रुपये कमिशन कापले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास त्यांची पिळवणूक होणे निश्चित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारnagpurनागपूर