शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:56 IST

भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून तो प्रलंबित आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देआचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून तो प्रलंबित आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.स्वच्छ सर्वेक्षणात शहर माघारल्याने स्वच्छतेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. परंतु कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविताना यातून निर्माण होणाऱ्या जैव उत्पादनातून महापालिकेला उत्पन्न व्हावे या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. जूनपासून दर महिन्याला भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील एक एकर जागा खाली होणार आहे. काही महिन्यात भांडेवाडी येथील २१ एकच जागा खाली होईल. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास कायमचा बंद होणार आहे.भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे काही वर्षापूर्वी हंजर कंपनी कचऱ्यापासून खत तयार करण्याचे काम करीत होती. परंतु हा प्रकल्प काही वर्षातच बंद पडला. त्यामुळे दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण झाल्यास समस्या त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आधीच नियोजन करावे लागणार आहे. बायोडिझेल व सीएनजी निर्माण केल्यास महापालिकेच्या बसेस त्यावर चालविता येईल. याचा विचार करता बायोडिझेल व सीएनजी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे.स्वच्छतेत क्रमांक घसरलाशहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यावर प्रक्रिया होत नसल्याने स्वच्छतेत नागपूरचा क्रमांक घसरला. याचा विचार करता महापालिकेच्या दहा झोनमध्ये दहा कचरा ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहेत. हनुमाननगर झोनमधील बुधवार बाजार येथे स्टेशन सुरू करण्यात आले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत असल्याने स्टेशन परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीपासून त्रास होत नाही. याच धर्तीवर शहरातील इतर झोनमध्ये ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectricityवीज