शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर आढावा कार्यक्र म बदलला

By admin | Updated: July 12, 2017 02:51 IST

मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी व कर संकलन समिती आणि स्थायी समितीने

कर विभागाची बैठक रद्द : अध्यक्ष व आयुक्तांचा झोननिहाय आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी व कर संकलन समिती आणि स्थायी समितीने झोननिहाय आढावा घेण्याचा वेगवेगळा कार्यक्रम निश्चित केला होता. यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने कर आकारणी विभागाची मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली तसेच झोननिहाय आढावा कार्यक्र मात बदल करण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव व आयुक्त अश्विन मुदगल बुधवारपासून आढावा बैठका घेणार आहेत. संदीप जाधव यांनी कर आकारणी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून विभागाची बैठक रद्द करण्याची सूचना केली तसेच १२ जुलैपासून आढावा कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली. पाणी व मालमत्ता कर थकीत असलेल्या ग्राहकांसाठी नागपूर महापलिकेतर्फे १७ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्त झोननिहाय आढावा घेणार आहेत. मालमत्ता कर व जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व नियोजनाचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे. १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता हनुमाननगर आणि ४.३० वाजता धंतोली झोन, १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गांधी-महाल झोन, ४.३० वाजता सतरंजीपुरा झोन, १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता लक्ष्मीनगर झोन, ४.३० वाजता धरमपेठ झोन, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नेहरूनगर झोन, ४.३० वाजता लकडगंज झोन तर १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसीनगर झोन आणि ४.३० वाजता मंगळवारी झोनचा स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त आढावा घेणार आहेत. झोन स्तरावर आढावा बैठक आयोजित करण्याबाबत कर आकारणी विभागाशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार १२ जुलैला बैठक ठरली होती. परंतु कर विभागाच्या पत्रकात ११ जुलैला बैठक आयोजित करण्यात आली होती. समन्वय न झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली.