शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल लाईनच्या मार्किंगनंतर संपत्तीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:21 IST

मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजुना भंडारा रोड : ३.२८ कि़मी. रस्त्याचे रुंदीकरण, पावसामुळे मार्किंगच्या कामात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलदरम्यान जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित आहे. पण कोर्टाच्या निर्देशानंतर ३.२८ कि़मी. लांबीच्या या रस्त्यावर मार्किंग प्रक्रिया सुरू झाली आहे.मनपाच्या नगररचना विभागाच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनतर्फे मार्किंग करण्यात येत आहे. गुुरुवारी मेयो हॉस्पिटल ते गांजाखेतपर्यंत एक कि़मी.पर्यंत मार्किंग करण्यात आले आहे. उर्वरित रस्त्याचे मार्किंग आठवड्यात पूर्ण होणार असल्याची माहिती झोनच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. पावसामुळे सेंट्रल लाईनच्या मार्किंगमध्ये समस्या येत आहे. दुसरीकडे सिटी सर्वे २७ आॅगस्टपासून रस्त्याच्या रुंदीकरणामुळे प्रभावित होणाºया संपत्तीचे सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्याची अंतिम तारीख अजूनही निश्चित केलेली नाही.सोमवार, १३ आॅगस्टपासून रस्त्याच्या मध्यभागात मार्किंगचे काम सुरू झाले. गुरुवारपर्यंत गांजाखेतपर्यंत मार्किंग पूर्ण झाले आहे. आता तीननल चौक ते शहीद चौक या मार्गाने सुनील हॉटेलपर्यंत मार्किंग होणार आहे. वर्ष २०११ मध्ये मार्किंग करण्यात आले होते, पण ते आता गायब झाले आहे. त्यामुळे नव्याने मार्किंगचे काम सुरू केले आहे. गांधीबाग झोनच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. शुक्रवारी सुटी असल्यामुळे काम बंद होते.प्राप्त महितीनुसार, मनपातर्फे सेंट्रल लाईनचे मार्किंग केले जाईल. त्यानंतर संपत्तीच्या मार्किंगचे काम सिटी सर्व्हेला करायचे आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे प्रभावित होणाऱ्या संपत्तीच्या सर्वेक्षणासाठी मनपाने सिटी सर्वेला २९.४६ लाख रुपये अदा केले आहे. सिटी सर्वे विभाग क्र.-१ ला हे काम दिले आहे.४५० संपत्ती तुटण्याचे संकेतसंबंधित रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे ४५० संपत्ती तुटण्याचे संकेत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रभावित होणाऱ्या संपत्तीला मनपाने नोटीस जारी करून भरपाई देण्याकरिता टीडीआर, एफएसआय अथवा रोख भुगतानाचा पर्र्याय दिला आहे. संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता मनपाला ६०० ते ७०० कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. ही बाब मनपासाठी महागडी ठरणार आहे. सिटी सर्व्हेचा अहवाल आल्यानंतरच वास्तविकता स्पष्ट होणार आहे.रस्ता होणार ६० ऐवजी ८० फूट रुंदजुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या डीपीआरमध्ये हा रस्ता ८० फूट रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतरही लोकांमध्ये रस्ता ६० फूट रुंद होणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीपीआरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. संबंधित रस्ता ८० फुटाचा होणार असून रुंदी कमी करण्यात आलेली नाही. मार्किंग पूर्ण झाल्यानंतर प्रभावितांसोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच काम सुरू होईल. रस्ता रुंदीकरणामुळे मध्य नागपूर भंडारा रोडशी जोडले जाईल. त्यामुळे मध्यची पूर्वी नागपूरशी कनेक्टिव्हिटी उत्तम होईल. सध्या अनेक ठिकाणी हा रस्ता केवळ २० फुटाचा राहिला आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर