शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

योग्य काळजी घेतल्यास आजार राहील दूर; सॅनिटायझर अत्यावश्यक नाहीच, साबण पुरेसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:04 IST

आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही.

ठळक मुद्देहातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या कोरोनाच्या संशयित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर या कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. हा साथीचा आजार आहे. हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही.हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक सॅनिटायझर विकत घेण्यावर भर देत आहेत. कारण त्यामुळे हात स्वच्छ ठेवले जातात. परंतु, केवळ साबणाने हात स्वच्छ आणि योग्य प्रकारे धुतले तर कोरोनापासून दूर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनाकारण महागडे सॅनिटायझर घेण्याची गरज नाही. हात स्वच्छ ठेवणेआवश्यक आहे. कारण कोरोनाबाधितद्वारेकोरोना विषाणू कुठेही लागू शकतो. आपणहात कुठेही ठेवतो आणि हाताला तो विषाणू लागून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हातांची योग्य स्वच्छता करावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.वारंवार हात धुणे का आवश्यक आहे?सूक्ष्मीजीवशास्त्रानुसार ४० टक्के इन्फेक्शन हे हाताद्वारे होतात. ‘कोविड-१९’ या विषाणूचा प्रसार, बाधित रुग्णांच्या शिंकेतून अथवा खोकल्यातून तर होतोच पण या शिवाय रुग्णांच्या शिंकेतून वा खोकल्यातून बाहेर पडलेले विषाणू हाताळणाऱ्या वस्तूंवर पडून तिथे साधारणपणे ९ दिवस जिवंत राहू शकतात. या वस्तू इतरांनी हाताळून च्या नाकाला वा चेहºयाला हात लावला तर त्यांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून वारंवार हात धुण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.-डॉ. राजेंद्र सुरपाम विभाग प्रमुख,सूक्ष्मजीवशास्त्र, मेडिकलकोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण आवश्यक काळजी घेणे जरूरीचे आहे. जेवणाआधी, बाहेरून जाऊन आल्यावर वस्तूंना हाताळल्यानंतर, खेळणी खेळल्यानंतर मुलांनी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. शाळेतही डबा खाण्यापूर्वी कंटाळा न करता हात धुणे आवश्यक आहे. सर्दी, शिंका, खोकला यामध्ये तोंडावर रुमाल ठेवून क्रिया करण्याची सवय मुलांना लावणे आवश्यक आहे. तो रुमाल वेगळा ठेवावा. दुसºया दिवशी धुवून टाकावा. कोणतीही वस्तू लहान मुले तोंडात घालू पाहातात. याकडे लक्ष ठेवावे. मुलांचे कपडे, डबा या गोष्टी स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. थुंकणे, खूप जवळ जाऊन बोलणे, शिंकणे या गोष्टी टाळल्या जातील हे पालकांनी पाहावे. बाहेर जाताना महागड्या मास्कऐवजी साधा रुमाल बांधला तरी चालतो.

- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस