शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्स पॉलिसीची तातडीने घोषणा करा : कॅटची केंद्र सरकारकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:11 IST

e-commerce policy व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन करताना, केंद्र सरकारने ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतीने संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे अनेकांवर शोरूम बंद करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन करताना, केंद्र सरकारने ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतीने संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

भारतात ८ कोटींपेक्षा जास्त लहान व्यावसायिक आहेत. कोरोना महामारीमुळे १.५० कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांवर शोरूम वा दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातच मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या लोकांना जास्त सवलतीत वस्तू देत असल्याने, त्याचेही संकट व्यापाऱ्यांवर आले आहे. ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव पाहता, कॅटने व्यापाऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी पोर्टल लॉन्च केले आहे. याचा दुकानदारांना फायदा होत आहे. कॅटने ई-कॉमर्स धोरणासह ई-कॉमर्स व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या अंतर्गत ई-कॉमर्स धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्याचे सुचविले आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना एफडीए धोरणात कोणतीही सूट देण्याची आवश्यकता नाही. एफडीए नियमांचे सक्तीने पालन करावे, असे बंधन या कंपन्यांवर टाकावे. ई-कॉमर्स पॉलिसी आली, तर देशात सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा राहील.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, ई-कॉमर्स देशाचे भविष्य आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच नियमांचे पालन करण्यासाठी ई-कॉमर्स पॉलिसीची गरज आहे. कोरोना महामारीपूर्वी ई-कॉमर्सचा व्यवसाय ६ टक्के होता, तो सध्या २४ टक्क्यांवर गेला आहे. शहरी भागातील ४२ टक्के इंटरनेट उपयोगकर्ते आता ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करीत आहेत. अशा स्थितीतही देशातील दुकाने आपली भूमिका महत्त्वपूर्ण बजावत राहतील, पण त्यांना प्रोत्साहनपर धोरणांची गरज आहे. ४५ बिलियन डॉलर असलेला भारतातील ई-कॉमर्स बाजार २०२६ पर्यंत २०० बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. देशात इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे ६८७ दशलक्ष डिजिटल उपयोगकर्ते आहेत. त्यापैकी ७४ टक्के ई-कॉमर्स व्यवसायात सक्रिय आहेत. भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनMarketबाजार