शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य तोडण्याची भाषा बोलणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 20:51 IST

महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रकाश जाधव : विदर्भवाद्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.देशाचे नेतृत्वा महाराष्ट्राने करावे, यासाठी शिवसेनेची धडपड आहे. त्यासाठी राज्याच्या सीमेवरची गावे महाराष्ट्रात जोडण्यासाठी सातत्याने लढा देत आहे. अशात विदर्भाच्या विकासाच्या नावावर महाराष्ट्राला तोडण्याची भाषा अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती आणि काही वकील मंडळी करीत आहे. विदर्भाच्या आंदोलनातील काही वकील मंडळी सरकार क्षेत्र, प्राधिकरण, महापालिका, नगरपालिका, बँका, कृषी, श्रमविभाग अशा सर्व शासकीय व अशासकीय व्यवस्थेवर पॅनलवर कार्य करीत आहे. ही मंडळी राज्याच्या सर्व सुखसोई, वेतन, भत्ते याचा लाभ मिळवित आहे. त्यांना पॅनलवरून काढून, त्यांची चौकशी करून, राजद्रोहाची कारवाई होणे गरजेचे आहे. विदर्भाच्या मागासलेपणाला त्या-त्या वेळेचे राज्यकर्ते जबाबदार आहे. विकासात भेदभाव, असमतोलपणा असल्यामुळे राज्य तोडण्याची भाषा योग्य नाही. आपले हक्क मिळविण्यासाठी ‘मतांचा’ अधिकार वापरून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. प्रबीरकुमार चक्रवर्तीसारखे लोक पदावर असताना काहीच करू शकले नाही, आता वेगळा विदर्भ पाहिजे म्हणतात हे चुकीचे आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांची गय आता शिवसेना करणार नाही, आम्हीसुद्धा अखंड महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. पत्रकार परिषदेला किशोर पराते, रमेश मिश्रा, रमेश बक्षी, डॉ. रामचरण दुबे, मंगेश कडव उपस्थित होते.विदर्भाच्या चाब्या भाजपाच्या हातीभाजपाचे काही आमदार वेगळ्या विदर्भाची मागणी करीत, दबाव निर्माण करीत आहे. आज विदर्भाच्या विकासाच्या चाब्या भाजपाच्या हातात आहे. विदर्भातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी साधावा, असा टोला जाधव यांनी हाणला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVidarbhaविदर्भ