शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मैदानांना उद्यानामध्ये रूपांतरित करण्यास मनाई : दिवाणी न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:32 IST

खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित भूखंडांना उद्यानामध्ये रूपांतरित करण्यात येऊ नये, असा आदेश दिवाणी न्यायालयाने मंगळवारी दिला.

ठळक मुद्देमैदाने वाचविण्याचा अर्ज मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित भूखंडांना उद्यानामध्ये रूपांतरित करण्यात येऊ नये, असा आदेश दिवाणी न्यायालयाने मंगळवारी दिला.यासंदर्भात क्रीडा प्रशिक्षक अजय चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश पी. पी. नायगावकर यांनी विविध बाबी लक्षात घेता त्यांचा अर्ज मंजूर करून हा आदेश दिला. विकास आराखडा, नगर रचना आराखडा व डीसीआर नियमानुसार खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडांवर उद्याने, ग्रीन जीम व लॉन तयार करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या आहेत. अनेक मैदानांना उद्यानामध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे विविध नियमांचे व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले आहे. महापालिकेची ही कृती एकतर्फी आहे. महापालिका अधिकारांचा दुरुपयोग करीत आहे, असे अर्जदाराचे म्हणणे होते. अर्जदारातर्फे अ‍ॅड. प्रकाश नायडू यांनी कामकाज पाहिले.मुलांनी खेळायचे कुठे?शहरात मैदानेच शिल्लक राहिली नाही तर, मुलांच्या खेळण्याचा प्रश्न निर्माण होईल. उद्यानामध्ये खेळता येत नाही. खेळणे बंद झाल्यानंतर मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्यांची शारीरिक बळकटता नष्ट होईल. ते करमणुकीसाठी कॉम्प्युटर, मोबाईल इत्यादी उपकरणांकडे आकर्षित होतील, याकडेही अर्जदाराने न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

 

टॅग्स :Courtन्यायालयOrder orderआदेश केणे