शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बोगस बियाणे विक्रीतून कंपन्यांची नफाखोरी

By admin | Updated: July 10, 2016 01:53 IST

विदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची

पाच कंपन्यांचा समावेश : हजारो शेतकऱ्यांचा घातजीवन रामावत ल्ल नागपूरविदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कृषी विभागाने या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत परीक्षण केले असता हा भंडाफोड झाला आहे. या कंपन्यांमध्ये कावेरी सीड्स, मे. दप्तरी अ‍ॅग्रो प्रा. लि. सेलू, यशोदा सीड्स, कंपनी हिंगणघाट,रायझिंग सन सीड्स, नागपूर आणि स्वत: शासनाच्या महाबीज कंपनीचा समावेश आहे. यापैकी कावेरी सीड्स कंपनीने कापूस आणि इतर सर्व कंपन्यांनी धान बियाण्याची विक्री केली आहे. विशेष म्हणजे,‘लोकमत’ने मागील १५ दिवसांपूर्वीच रायझिंग सन या कंपनीच्या बोगस धान बियाण्याचा भांडाफोड केला होता. मात्र कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी थातूरमातूर कारवाईचा दिखावा करून, त्या कंपनीला पाठीशी घातले होते. माहिती सूत्रानुसार मागील काही दिवसांत कृषी विभागाकडे बोगस धान बियाण्याच्या हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना परस्पर दुसरे बियाणे देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशाप्रकारे या बियाणे कंपन्यांचा सर्वत्र तांडव सुरू असताना कृषी विभाग मात्र मूग गिळून बसला आहे. कृषी विभागाच्या कागदावर ७ जुलैपर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असून, विभागातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिवाय या सर्व शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी करून, त्याची पेरणी केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतावरील बियाण्यांची उगवणच झालेली नाही. यामुळे अगोदरच नापिकी आणि दुष्काळाच्या चक्रात अडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा आता पुन्हा या कंपन्यांनी घात केला आहे. खटले दाखल करणार या सर्व कंपन्यांनी आणि बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने नापास (फेल) झाले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आणि त्यांचे बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. यात संबंधित पाच बियाणे उत्पादक कंपन्यांसह अहेरी येथील प्रकाश कृषी सेवा केंद्र, मनोज कृषी सेवा केंद्र, भडाळा येथील नरेंद्र कृषी सेवा केंद्र, शुभम कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. - एस.पी. गावंडे विभागीय गुणनियंत्रण अधिकारी