शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत; लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता २० टनावर न्यायची आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:22 IST

citrus fruits Nagpur News लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये देशाची उत्पादकता १२ ते १३ प्रति हेक्टर टनावर पोहचली असली तरी ती आम्हाला २० टन प्रति हेक्टरवर न्यायची आहे, असा विश्वास केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये देशाची उत्पादकता २५ वर्षांपूर्वी ६ ते ७ प्रति हेक्टर टन होती. आज ती १२ ते १३ प्रति हेक्टर टनावर पोहचली असली तरी ती आम्हाला २० टन प्रति हेक्टरवर न्यायची आहे, असा विश्वास केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

देशात एकमेव असलेल्या नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या यशाबद्दल डॉ. लदानिया म्हणाले, लिंबूवर्गीय फळपिकांच्या निर्यातीमध्ये आज चीन पहिल्या तर ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसºया स्थानावर आहे. दरवर्षी ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात भारतामधून होते. भविष्यात वाढलेल्या उत्पादकतेमधून हे चित्र बदलेले असेल. रोगमुक्त आणि कमी खर्चात अधिक उत्पादकतेच्या कलमा देणे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी नव्या प्रजाती शोधून त्या स्थानिक वातावरणामध्ये विकसित करण्यासाठी आमचे संशोधन सातत्याने सुरू असते. मागील पाच वर्षात संस्थेने १७ लाख रोगमुक्त कलमा दिल्या. त्याची परिणती आता वाढलेल्या उत्पादकतेमध्ये दिसत आहे.उत्पादकता वाढीसाढी नवे तंत्रज्ञान वापरत असल्याचे सांगून डॉ. लदानिया म्हणाले, सध्या एका हेक्टरमध्ये २७७ झाडे लावली जातात. यापुढे नव्या तंत्रातून ७०० ते ८०० झाले लावली जातील. ६ बाय ६ ऐवजी ६ बाय ३ असे अंतर राहील. ६ वर्षापूर्वी संशोधन केंद्रात केलेला हा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. शुट-टिप-ड्राफ्टिंग हे तंत्र वापरून मातृवृक्ष रोगमुक्त करण्याचे विशेष संशोधन संस्थेने केले आहे.१५ वर्षातील संशोधनमागील १५ वर्षात केंद्रातून मोसंबी, संत्रा, लिंबूच्या अनेक प्रजाती संशोधित आणि वितरित झाल्या आहेत. डिंक्या रोगाला प्रतिकारक असलेली अलिमाऊ संत्रा ही प्रजाती २०१२-१३ मध्ये संशोधित झाली. लिंबूमध्ये एनआरसीसी-७, एनआरसीसी-८, यासह ९ प्रजाती संशोधित व वितरित झाल्या आहेत. कमी बियांच्या तीन संत्रा जाती एनआरसीसी सीडलेस-४, मोसंबीमध्ये ज्यूससाठी कटर व्हॅलेन्सिया, पमोलोमध्ये एनआरसीसी-५ यासह विविध प्रकारच्या ६१५ प्रजातींचे संशेधन झाले आहे. मोसंंबीमध्ये जाफा व ब्लड रेड माल्टा, ब्राझीलवरून आणलेल्या वेस्टीन आणि हॅमलिन या चार प्रजाती तसेच संत्रामध्ये पर्ल टँजेलो आणि डेझी या दोन अशा ६ प्रजाती नव्यानेच विकसित झाल्या आहेत.

 

टॅग्स :fruitsफळे